मोलकरणीने डॉक्टरच्या बेडरूममधून केले साडेपाच लाख रुपये लंपास
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2020 22:05 IST2020-03-31T21:58:05+5:302020-03-31T22:05:27+5:30
चार तासात गुन्हा उघड

मोलकरणीने डॉक्टरच्या बेडरूममधून केले साडेपाच लाख रुपये लंपास
यवतमाळ : शहरातील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ महेश शहा यांच्याकडे साडेपाच लाख रुपयांची चोरी झाल्याची बाब मंगळवारी सकाळी उघडकीस आली. याप्रकरणी अवधूत वाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर अवघ्या काही तासातच पोलिसांनी गुन्हेगाराचा शोध घेऊन गुन्हा उघड केला.
अवधूत वाडी पोलीस ठाण्याच्या शोध पथकाने संशयित म्हणून डॉक्टरांकडे काम करणाऱ्या एका महिलेला ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता तिने हा गुन्हा कबूल केला. सोमवारी सायंकाळी डॉक्टरांच्या बेडरूमची सफाई करत असताना त्यातील कपाटात ठेवलेली साडेपाच लाख रुपयांची रोख रक्कम चोरी केल्याची कबुली या सफाई कामगार महिलेने दिली.
पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन रीतसर गुन्हा दाखल केला आहे. शोध पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक विवेक देशमुख व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी आरोपीचा शोध लावला. कोरोना संचारबंदीचा ताण असतानाही पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन गुन्हा उघड केला.