शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

बिहारमध्ये खेळली गेली रक्तरंजीत होळी; एका दिवसात 20 हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 20:15 IST

बेगूसराय शहरातील लोहिया नगरमध्ये मजुरांची सायकल दुचाकीवर धडकल्याने दुचाकीस्वाराने मजुरांना मारहाण करून हत्या केली.

ठळक मुद्देनालंदामध्ये गेल्या २४ तासांत ४ लोक बेपत्ता झाले आहेत. कटिहारच्या मनसाहीमध्ये गुन्हेगारांनी किराणा व्यावसायिकाला गोळ्या घालून ठार केले. बेगूसरायमध्ये साहेबपूर कमल पोलीस स्टेशनच्या हद्दीत सबदलपूर गावात बटाटे खरेदीच्या वादातून गुन्हेगारांनी तीन जणांना गोळ्या घातल्या.

बिहार - यंदा बिहारमध्ये होळीच्या सणाला गालबोट लागले असून रक्ताने माखलेली होळी साजरी झाली. होळीच्यादिवशी बिहारमध्ये जवळपास २० जणांची हत्या करण्यात आली. या सर्व हत्या होळीच्या दिवशीच घडल्या. यात जेडीयूच्या विद्यार्थी नेत्यासह 2 व्यवसायिकाची हाती करण्यात आली आहे. बर्‍याच खुनाच्या घटना पाटणा आणि नालंदा येथे घडल्या आहेत.पाटण्यातील होळीच्या रात्री जेडीयूचे विद्यार्थी नेते कन्हैया कौशिक यांची हत्या करण्यात आली. पाटणा येथील पटेल नगर परिसरात युवा छात्र नेत्याची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याने विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप पाहायला मिळाला. जेडीयू विद्यार्थी नेत्याच्या हत्येच्या घटनेत एक व्यक्तीही जखमी झाला आहे. विद्यार्थी नेत्याच्या हत्येप्रकरणी दोन जणांना अटकही करण्यात आली आहे. दुसरीकडे, पाटणा जिल्ह्यातील गोपालपूर पोलीस स्टेशन, बख्तियारपूर आणि बाढ पोलीस स्टेशन भागात एका युवकाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. बख्तियारपूरच्या लक्ष्मणपूर येथे विटांनी हल्ला करुन एका अल्पवयीन मुलाची हत्या करण्यात आली. फक्त पाटणा जिल्ह्यात पाच हत्या झाल्या आहेत.नवादा येथे एका भावाने आपल्या पत्नीला रंग लावल्याने मोठ्या भावाची हत्या केली. नवादाच्या वारिसलीगंजमधील या घटनेमुळे गावातील गावकरी हैराण झाले आहेत. भागलपूरमध्ये डीजे वाजविण्याच्या वादातून एका तरूणाला ठार मारण्यात आले होते आणि सीवानमध्ये एका सेवानिवृत्त कामगाराला गुन्हेगारांनी गोळ्या घालून ठार मारले. बेगूसरायमध्ये साहेबपूर कमल पोलीस स्टेशनच्या हद्दीत सबदलपूर गावात बटाटे खरेदीच्या वादातून गुन्हेगारांनी तीन जणांना गोळ्या घातल्या. ज्यामध्ये एकजण ठार तर दोनजण गंभीर जखमी असल्याचे समजत आहे.बेगूसराय शहरातील लोहिया नगरमध्ये मजुरांची सायकल दुचाकीवर धडकल्याने दुचाकीस्वाराने मजुरांना मारहाण करून हत्या केली. गोपालगंज येथे दुचाकीस्वाराला दुसऱ्या दुचाकीचा धक्का लागल्याने दुचाकीस्वार युवकाची बेदम मारहाण करून हाती करण्यात आली. या घटनेत तो गंभीर जखमी झाला. मुंगेरमधील एक जावई कित्येक दिवसांपासून बेपत्ता होता. त्याचा शोध सुरू असताना, जावई सापडला नाही तेव्हा सासऱ्याला गोळ्या घातल्या आणि  त्याचा जागीच मृत्यू झाला. नालंदामध्ये गेल्या २४ तासांत ४ लोक बेपत्ता झाले आहेत. पहिल्या घटनेत नगरनौसा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांनी राजेश यादव नावाच्या व्यक्तीची गोळ्या घालून हत्या केली. दीपनगर पोलीस स्टेशन परिसरातील महेश मिस्त्री आणि गोखुलपूर ओपी पोलीस स्टेशन भागात नीरज कुमार यांना ठार मारण्यात आले, तर बेना पोलीस स्टेशन परिसरातील चैनपुरा येथे मंटू कुमार यांना गुन्हेगारांनी मारहाण केली. आरा येथील होळीच्या रात्री उशिरा एका वृद्ध व्यक्तीला मारहाण करून जखमी केले, त्याचा बुधवारी सकाळी मृत्यू झाला. तसेच कटिहार आणि समस्तीपूर येथे दोन व्यावसायिकाची हत्या करुन गुन्हेगार पळून गेले. कटिहारच्या मनसाहीमध्ये गुन्हेगारांनी किराणा व्यावसायिकाला गोळ्या घालून ठार केले. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या व्यावसायिकाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समस्तीपूरमधील विभूतीपुरात गुन्हेगारांनी दुसऱ्या देखील व्यावसायिकाला गोळ्या घातल्या. सीतामढीमध्ये जमावबंदी प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला. व्यापाऱ्यांना लुटून मारहाण करणाऱ्या दुचाकीस्वार गुन्हेगारांना ग्रामस्थांनी घेराव घातला. एक गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला.

टॅग्स :MurderखूनBiharबिहारPoliceपोलिस