शहरं
Join us  
Trending Stories
1
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
2
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
3
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
4
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
5
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांचा 'चतुर' मारा; ऋतुराज गायकवाड एकटा भिडला अन् विराटला... 
6
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
7
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
8
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
9
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
10
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
11
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
12
BANW vs INDW: मालिका एकतर्फी जिंकण्याची टीम इंडियाला सुवर्णसंधी; बांगलादेशात भारताचा दबदबा
13
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
14
बाळासाहेब रागावले तर माँसाहेब जवळ करायच्या, याउलट उद्धव ठाकरेंकडे...; शिंदेचे शिलेदार थेटच बोलले
15
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
16
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
17
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम
18
पाकिस्तानला करायचीय भारताची बरोबरी, या दिवशी लॉन्च करणार 'चंद्रयान'! असं असेल संपूर्ण मिशन
19
मुंबई लोकलमधून पडून आणखी एका तरुणाचा बळी; सात दिवसात तिघांचा मृत्यू
20
मराठमोळ्या अभिनेत्रीचा तुतारीला पाठिंबा, शरद पवारांसोबत स्टेजवर येत केला प्रचार

जामिनासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने कोयता, बिअरच्या बाटलीने मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 4:01 PM

वाकड येथील प्रकार : चौघांविरोधात गुन्हा दाखल..

पिंपरी : भाऊ जेलमध्ये असून त्याच्या जामिनासाठी ३० हजार रुपये दे, अशी मागणी केली. मात्र पैसे देण्यास नकार दिल्याने आरोपींनी कोयता व बिअरच्या बाटलीने तसेच हातातील स्टीलच्या कड्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली. वाकड येथील गणेशनगर येथे मोकळ्या मैदानात शनिवारी (दि. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास हा प्रकार घडला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, याप्रकरणी सतीश साहेबराव सावंत (वय ३०, रा. गणेशनगर, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार गंग्या उर्फ रोहन वासू वाघमारे (वय २५, रा. वाकड), किरण संभाजी तनपुरे (वय २३), नण्या ढवळे (वय २५, दोघेही रा. गणेशनगर) व आरोपी गंग्या याचा एक २० वर्षीय मित्र यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फियार्दी सावंत शनिवारी रात्री जेवण केल्यानंतर घराशेजारील पानटपरीवर आले असता आरोपी त्यांना मोकळ्या  मैदानात घेऊन गेले. किरणचा भाऊ विकास तनपुरे हा जेलमध्ये आहे. त्याचा जामीन करायचा आहे. त्यासाठी तू ३० हजार रुपये दे, असे सांगितले असता फियार्दी सावंत यांनी नकार दिला. त्या कारणावरून आरोपींनी संगनमत करून फियार्दी सावंत यांना शिवीगाळ करीत त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच कोयता व बिअरच्या बाटलीने व हातातील स्टीलच्या कड्याने मारहाण केली. यात त्यांच्या डोक्याला मारून गंभीर जखमी केले. त्यामुळे त्यांच्या हात, पाय व डोक्यातून रक्क वाहू लागले. उद्या पैसे देतो, असे फियार्दी सावंत यांनी सांगितले. त्यामुळे आरोपींनी त्यांना सोडून दिले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

टॅग्स :wakadवाकडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस