The highway truck entered the house while the sugar was burning; The death of both | साखरझोपेत असताना हायवा ट्रक घरात घुसला; दोघांचा मृत्यू
साखरझोपेत असताना हायवा ट्रक घरात घुसला; दोघांचा मृत्यू

चंद्रपूर : गिट्टी भरलेला हायवा घरात शिरला. घरात खाटेवर गाढ झोपेत असलेल्या दोघांना हायवाने चिरडले. यात त्या दोघांचा झोपेतच मृत्यू झाला. ही थरारक घटना पोंभुर्णा तालुक्यातील चेकठाणा येथे प्रजासत्ताक दिनी पहाटे पाच वाजताच्या सुमारास घडली. 


उमाजी तिवाडे (४०) व देविदास वासूदेव झगडकर (४५) असे मृतांची नावे आहेत. या घटनेने गावकरी संतापले असून त्यांनी रास्तारोको केला आहे. आरोपीचा शोध पोंभुर्णा, व बेंबाळ पोलीस घेत आहेत.

मित्रासोबत सहभोजन घेऊन ते दोघे झोपी गेले. साखरझोपेतच दोघांचा दूदैवी मृत्यू झाला. ही घटना पोंभुर्णा तालूक्यातील चेकठाणा येथे घडली. शेतीच्या कामासाठी देविदास झगडकर व उमाजी तिवाडे हे चेकठाणा येथे आले होते. उशिर झाल्याने ते चेकठाणा येथिल नातेवाईक सोनटक्के यांच्या घरी झोपी गेले होते. सोनटक्के यांचे घर बसस्थानक परिसरात आहे. दोघांनी सोनटक्के परिवारासोबत सहभोजन घेतले अन झोपी गेले. पहिल्या खोलीत झगडकर आणि तिवाडे झोपले होते. तर दुसऱ्या खोलीत सोनटक्के यांचे कुटूंब झोपले होते. दरम्यान, पाच वाजता नंदोरी येथून गिट्टीने भरलेला भरधाव हायवा विठ्ठलवाडाकडे निघाला  होता. ड्रायव्हरला डुलकी लागल्याने गाडीवरील नियंत्रण सुटले. अनियंत्रित हायवा सोनटक्के यांचा घरातच शिरला. 


या अपघातात झगडकर, तिवाडे यांचा घटस्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहीती होताच गावकरी रस्तावर आले. पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळ गाठले आहे.

Web Title: The highway truck entered the house while the sugar was burning; The death of both

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.