शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचाराच्या अखेरच्या दिवशी शिंदेसेना-ठाकरेसेना आमनेसामने; छत्रपती संभाजीनगरात राडा
2
POK मध्ये युद्धजन्य परिस्थिती; पाकिस्तानच्या दादागिरीविरोधात काश्मिरी जनता रस्त्यावर
3
Fact Check : "मी तुम्हाला बेरोजगार करेन..."; योगी आदित्यनाथ यांच्या Video मागचं जाणून घ्या, 'सत्य'
4
Arvind Kejriwal Pakistan: अरविंद केजरीवाल यांच्या सुटकेवर थेट पाकिस्तानकडून आली प्रतिक्रिया, काय म्हणाले फवाद चौधरी?
5
Paytm चे 'अच्छे दिन' परतले; २ दिवसांत १३%ची वाढ, काय म्हणतायत एक्सपर्ट, किती आहे टार्गेट प्राईज?
6
मसाल्यांमधील ETO केमिकल्सवर सरकार अंकुश लावण्याच्या तयारीत, निर्यातदारांना करावं लागणार 'हे' काम
7
रवींद्र धंगेकरांचा भाजपावर गंभीर आरोप, म्हणाले, ‘पुण्यात पैशांचे ट्रक आलेत, आज फडणवीस वाटप करतील’
8
प्रज्वल रेवण्णा प्रकरण उघडकीस आणणारा भाजपा नेता अडचणीत, पोलिसांनी केली अटक, समोर आलं असं कारण   
9
'दिल्लीत बोलवून फाईल दाखवली अन्...'; भाजप प्रचाराचे कारण सांगत काँग्रेसची राज ठाकरेंवर टीका
10
पुण्यातील सभेनंतर संजय राऊतांचा राज ठाकरेंवर हल्लाबोल; "ते महाराष्ट्रद्रोही...."
11
"राहुल गांधी हे 'रणछोड दास'; जे स्वत: निवडणूक जिंकू शकत नाही, ते आपल्या पक्षाला..."
12
खळबळजनक ! नोटांनी भरलेला 'छोटा हाथी' वाहन पलटी; रस्त्यावर पडले तब्बल ७ कोटी
13
Mumbai Pali Hill Fire: मुंबईच्या पाली हिलमध्ये अग्नितांडव, थरकाप उडवणारा स्फोट; व्हिडिओ व्हायरल!
14
Beauty Tips: नैसर्गिकरित्या भुवया दाट करणं आता सहज शक्य; फॉलो करा 'या' तीन टिप्स!
15
खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंगकडे केवळ १ हजार रुपयांची संपत्ती, एवढं झालंय शिक्षण, शपथपत्रातून समोर आली माहिती
16
स्टार प्रवाहवरील ही लोकप्रिय मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप! काही मालिकांची वेळही बदलली
17
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबचे वाढदिवशी नव्या घरात गृहप्रवेश, व्हिडीओ आला समोर
18
Bank Of Baroda : ₹७.१६ डिविडंड, ₹४८८६ कोटींचा नफा; तुमच्याकडे आहे का 'या' सरकारी बँकेचा शेअर?
19
समोरासमोर या, विकासावर होऊ दे चर्चा; मिहिर कोटेचा यांचं संजय दिना पाटलांना आव्हान
20
खळबळजनक! दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने उघडलं हॉस्पिटल; 'असा' झाला पर्दाफाश

राज्यात ‘एसीबी’च्या ट्रॅपमध्ये अडकणाऱ्यांमध्ये पोलिसांचे प्रमाण सर्वाधिक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2019 6:01 PM

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी २०१९ ते १७ डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्यात ८२९ सापळे यशस्वी केलेत. त्यात एक हजार १२४ शासकीय अधिकारी, कर्मचारी अडकले

 - ज्ञानेश्वर मुंदे 

भंडारा - लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या ट्रॅपमध्ये राज्यात इतर विभागांच्या तुलनेत सर्वाधिक पोलीस अडकल्याचे दिसत आहे. जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत १८८ प्रकरणात २६२ पोलिसांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. विशेष म्हणजे यात वर्ग एकच्या १२ पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. ५३ लाख ९९ हजार ५५० रूपये लाचेच्या स्वरूपात स्वीकारून पोलिसांनी राज्यातील इतर विभागांनाही मागे टाकले आहे.लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने १ जानेवारी २०१९ ते १७ डिसेंबर २०१९ या कालावधीत राज्यात ८२९ सापळे यशस्वी केलेत. त्यात एक हजार १२४ शासकीय अधिकारी, कर्मचारी अडकले आहेत. त्यात लाचखोरीचे सर्वाधिक प्रमाण पोलीस खात्यात असल्याचे यावर्षीच्या कारवाईवरून दिसून येते. १८८ प्रकरणात पोलीस खात्यातील २६२ जणांना लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले. त्यात वर्ग एकचे अधिकारी १२, वर्ग दोनचे ११ अधिकारी तर २०२ तृतीय श्रेणी पोलीस कर्मचारी सापळ्यात अडकले आहे. पोलिसांना लाच घेताना सहकार्य केल्याप्रकरणी ३७ खाजगी व्यक्तींवरही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांचा थेट जनतेशी संबंध येतो. कारवाईची भीती दाखवून नागरिकांना लाच देण्यास अनेकदा बाध्य केले जाते. मात्र काही नागरिक याला बळी न पडता थेट तक्रार करतात. राज्याच्या सर्वच विभागात लाच घेण्यात पोलीस आघाडीवर असल्याचे दिसून येते. पोलिसांपाठोपाठ लाच घेण्यात महसूल, भूमिअभिलेख आणि नोंदणी विभागाचे अधिकारी, कर्मचारीही कुठे मागे नाहीत. या विभागात १८२ पक्ररणात २४४ जणांवर कारवाई करण्यात आली. त्या खालोखाल पंचायत समितीत ८४ प्रकरणात ११४ जण लाच प्रकरणात अडकले आहेत. वीज वितरण कंपनीतील ५७ कर्मचारी लाचेच्या प्रकरणात रंगेहाथ सापडले आहेत. शिक्षणासारख्या पवित्र खात्यातही लाचखोर असल्याचे यावर्षीच्या कारवाईतून दिसून आले. २८ प्रकरणात ४४ जणांना लाच घेताना अटक करण्यात आली. लाचेची सर्वाधिक प्रकरणे पुणे विभागातलाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या कारवाईत सर्वाधिक प्र्रकरणे पुणे विभागातील आहे. १७२ प्रकरणात २३९ जणांना लाच घेताना पकडण्यात आले आहे. नाशिक विभागात ११९ प्रकरणात १५८, नागपूर विभागात १०६ प्रकरणात १३६ जण, औरंगाबाद विभागात १२२ प्रकरणात १६६, अमरावती विभागात १०२ प्रकरणात १३९, ठाणे विभागात ९४ प्रकरणात १३१, नांदेड विभागात ७६ प्रकरणात १०३ आणि सर्वात कमी मुंबई विभागात ३८ प्रकरणात ५२ अधिकारी, कर्मचारी लाच घेताना रंगेहाथ सापडले आहेत. विदर्भात २०८ सापळेविदर्भातील ११ जिल्ह्यात वर्षभरात २०८ सापळे यशस्वी करण्यात आले. त्यात सर्वाधिक नागपूर जिल्ह्यात ३५, अमरावती २८, यवतमाळ २५, गोंदिया २२, भंडारा २०, अकोला १८, बुलढाणा १७, वाशिम १४, चंद्रपूर ९ आणि वर्धा जिल्ह्यात सात सापळे यशस्वी करण्यात आले आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBribe Caseलाच प्रकरणPoliceपोलिसAnti Corruption Bureauलाचलुचपत प्रतिबंधक विभागMaharashtraमहाराष्ट्र