High voltage drama in girlfriend's bedroom; IPS Purushottam Sharma suspended | गर्लफ्रेंडच्या बेडरुममध्ये हाय व्होल्टेज ड्रामा; आयपीएस पुरुषोत्तम शर्मा निलंबित

गर्लफ्रेंडच्या बेडरुममध्ये हाय व्होल्टेज ड्रामा; आयपीएस पुरुषोत्तम शर्मा निलंबित

भोपाळ : मध्य प्रदेशचे विशेष पोलीस संचालक पुरुषोत्तम शर्मा पत्नीच्या मारहाणीनंतर आणखी एक व्हिडीओ व्हारल झाला आहे. हा व्हिडीओ त्यांच्या पत्नीने शर्मांच्या गर्लफ्रेंडच्या फ्लॅटवर बनविला आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतरच शर्मा पत्नीवर भडकले होते. यानंतर शर्मा यांच्यावर सरकारने कारवाई केली असून त्यांना एडीजी पदावरून हटविण्यात आले आहे. 


या व्हिडीओवर शर्मा यांनी स्पष्टीकरण दिले असून मी जिथे जिथे जात असे पत्नी माझ्या मागे येत होती, असा आरोप केला आहे. पत्नीला मारहाण करण्यासाठी हाच आताचा व्हिडीओ कारणीभूत होता. यानंतर या मारहाणीचाही व्हिडीओ बनवून तो त्यांच्याच आयआरएस अधिकारी असलेल्या मुलाने मुख्यमंत्री, गृहमंत्री ते मोठमोठे पोलीस अधिकाऱ्यांना पाठविला होता. यावर गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांनी यावर सांगितले होते की, माझ्याकडे अद्याप कोणतीही लिखित तक्रार आलेली नाही. मी मीडियामध्येच याबाबतच्या बातम्या पाहिल्या आहेत. जेव्हा लिखित तक्रार येईल त्यानंतर कारवाई केली जाईल. यानंतर शर्मायांच्यावर कारवाई करत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सांगितले की, जो कायदा हातात घेईल त्याला सोडले जाणार नाही. 


मारहाणीच्या व्हिडीओनंतर शर्मा यांनी स्पष्टीकरण देताना मी कोणताही गुन्हा केलेला नाही. हा माझा कौटुंबिक प्रश्न आहे. ती जर माझ्यावर नाराज असेल तर माझ्यासोबत का राहत आहे. माझ्या पैशांचा वापर करते, परदेशात फिरायला जाते. या प्रश्नाला मी स्वत: सोडवेन. सेल्फ डिफेन्समध्ये माझ्याकडून केवळ झटापट झाली आहे. आता पत्नी आणि मुलगाच हा व्हिडीओ व्हायरल का केला ते सांगू शकतील. खरेतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये शर्मा एका महिला मैत्रिणीसोबत एका घरात बसलेले आहेत. तेव्हाच त्यांची पत्नी तिथे पोहोचते. तिला पाहून डीजी पुरुषोत्तम शर्मा तेथून उठतात आणि जातात. तिथे ते म्हणतात कोणाला भेटणे गुन्हा आहे का? जर मी या महिलेसोबत काही केले असेन तर तिने माझ्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करावा. शर्मा तिथून गेल्यावर त्यांची पत्नी त्या महिलेची चौकशी करते. 


 

बेडरुम दाखव 
शर्मा यांच्या पत्नीला संशय होता की ते दोघे आतमध्ये काहीतरी चुकीचे करत होते. कारण दरवाजा उघडायला दोघांना वेळ लागला होता. यामुळे त्यांनी त्या महिलेला बेडरूम दाखविण्यास सांगितले. त्या महिलेने तिला बेडरुपमपर्यंत नेले आणि तिला विचारले की त्यांच्यासोबत हैदराबादला गेली होतीस का? यावर तिने नाही असे सांगितले. 

Web Title: High voltage drama in girlfriend's bedroom; IPS Purushottam Sharma suspended

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.