हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची केली पोलिसांनी सुटका 

By पूनम अपराज | Updated: December 28, 2020 19:31 IST2020-12-28T19:30:33+5:302020-12-28T19:31:32+5:30

Sex Racket : एका भोजपुरी अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. 

High profile sex racket busted, police release two models | हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची केली पोलिसांनी सुटका 

हायप्रोफाईल सेक्स रॅकेट उद्ध्वस्त, अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची केली पोलिसांनी सुटका 

ठळक मुद्देपोलिसांनी या प्रकरणी कविता भोसले या दलाल महिलेला अटक केले आहे. अटक महिलेच्या संपर्कात अनेक मॉडेल्स आणि कलाकार असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 

मुंबई पोलिसांनी मोठी कारवाई करत मोठ्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा कक्ष ७ ने हे मोठं सेक्स रॅकेट उघडकीस आणले आहे. या सेक्स रॅकेटमध्ये मॉडल्ससह फिल्मी कलाकारांचा देखील समावेश आहे. पोलिसांनी या प्रकरणी कविता भोसले या दलाल महिलेला अटक केले आहे. तर एका भोजपुरी अभिनेत्रीसह दोन मॉडेल्सची पोलिसांनी सुटका केली आहे. या कारवाईने पुन्हा एकदा सिनेसृष्टीत खळबळ उडाली आहे. 

मुंबईच्या ईस्टर्न सबर्ब परिसरातील घाटकोपर येथे एक सेक्स रॅकेट सक्रिय आहे आणि त्यात वेश्या व्यवसायासाठी मॉडल्स आणि अभिनेत्रींचा वापर केला जात आहे,अशी माहिती मिळाली आणि त्यानुसार बनावट ग्राहक बनून या सेक्स रॅकेटचं बिंग उघड केले असल्याचं गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अकबर पठाण यांनी सांगितले. 

या पूर्ण रॅकेटच्या सूत्रधाराचा पत्ता लागलेला नाही, तो फरार असल्याचं सांगितलं जात आहे. अटक केलेल्या महिलेनं सांगितलं की, ती या महिलांकडून 3 टक्के कमिशन घेत होती. या रॅकेटमध्ये एक भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध कलाकार आहे. तिनं टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे, तर अन्य दोन मॉडेल्स आहेत.

पोलिसांना खात्रीलायक माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी बोगस ग्राहक बनून दलाल महिलेशी संपर्क साधला. बनावट ग्राहक बनलेल्या पोलिसांनी सिनेसृष्टीतील कलाकार किंवा मॉडेलची मागणी तिच्याकडे केली. आधी या महिलेने काहीच माहित नसल्याचा बनाव आखला. मात्र, काही दिवसांनी पोलिसांनी तुचा विश्वास संपादन केला आणि तिनं ग्राहक बनून आलेल्या पोलिसांकडे पैशांची बोलणी सुरु केली. एका रात्रीसाठी ५५ हजार रुपयांची मागणी केली. अटक महिलेच्या संपर्कात अनेक मॉडेल्स आणि कलाकार असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 

 

व्यवहार पूर्ण झाल्यानंतर त्या महिलेने ग्राहक बनलेल्या पोलिसाला तीन महिला दाखवायचे ठरलं. त्यापैकी एकीची निवड करायची होती. यासाठी घाटकोपरमधील एक हॉटेलही बुक केलं गेलं. तिथे ती त्या तीन महिलांसह आली. यात एक भोजपुरी सिनेमातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिनं टीव्ही मालिकांमध्येही काम केलं आहे, तर अन्य दोन मॉडेल्स आहेत. दरम्यान, हॉटेलच्या रुममध्ये ती महिला या अभिनेत्री आणि मुलींना दाखवत होती, त्याचवेळी गुन्हे शाखेच्या पथकाने धाड मारून तिघींची सुटका करत दलाल महिलेस अटक केली. 

Web Title: High profile sex racket busted, police release two models