हनी सिंगच्या शोमध्ये मोबाईल, गॅझेट्स चोरण्यासाठी विमानाने आले; हाय प्रोफाइल गँगचा पर्दाफाश
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 12:46 IST2025-03-04T12:46:30+5:302025-03-04T12:46:51+5:30
एका हाय प्रोफाइल गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रॅपर हनी सिंगच्या शोमध्ये ही गँग मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स चोरण्यासाठी मुंबईहून विमानाने आली होती.

हनी सिंगच्या शोमध्ये मोबाईल, गॅझेट्स चोरण्यासाठी विमानाने आले; हाय प्रोफाइल गँगचा पर्दाफाश
उत्तर प्रदेशातील लखनौमध्ये एका हाय प्रोफाइल गँगचा पर्दाफाश करण्यात आला आहे. रॅपर हनी सिंगच्या शोमध्ये ही गँग मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्स चोरण्यासाठी मुंबईहून विमानाने आली होती. पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे आणि त्यांच्याकडून चोरीचे सहा मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.
चौकशीदरम्यान, आरोपींनी सांगितलं की ते मोठ्या कार्यक्रमांवर लक्ष ठेवत असत आणि तिथे जाऊन मोबाईल आणि मौल्यवान वस्तू चोरत असत. अशा शोमधील बहुतेक लोक श्रीमंत कुटुंबातील असतात आणि ते नशेत असतात त्यामुळे चोरी करणं सोपं होतं असंही म्हटलं आहे.
डीसीपी पूर्व शशांक सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार, या दोघांव्यतिरिक्त, या गँगमध्ये इतर अनेक लोक आहेत, जे त्यांचे शौक पूर्ण करण्यासाठी चोरी करतात. पोलिसांनी फाइंड माय डिव्हाइसच्या मदतीने दोन्ही आरोपींना अटक केली आहे.
असे चोर मोठ्या कार्यक्रमांना आणि संगीत कॉन्सर्ट्सना लक्ष्य करतात. चोरी करण्यासाठी, ते कार्यक्रमांची महागडी तिकिटे देखील खरेदी करतात आणि गर्दीतून पैसे काढून पळून जातात. हे याआधी अनेक गायकांच्या कॉन्सर्ट्समध्ये झालं आहे. त्यामुळे सतर्क राहणं गरजेचं आहे.