शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

भारत - नेपाळ सीमेवर हाय अलर्ट; उत्तर प्रदेशात घुसले दोन दहशतवादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 16:27 IST

भारत - नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देअब्दुल समद व इलियास हे दोन पाहिजे असलेले दहशतवादी उत्तर प्रदेशात घुसले असून ते नेपाळच्या सीमेवरून पळून जाऊ शकतात. हे दोघेही भारत - नेपाळ सीमेला लगत असलेल्या जिल्ह्यामार्गे नेपाळमध्ये पलायन केले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

बस्ती - आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटच्या (आयएस) दोन दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशात प्रवेश केल्याच्या गुप्तचर यंत्रणांना माहिती मिळाल्यानंतर भारत - नेपाळच्या सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे. बस्ती क्षेत्रातील पोलिस महानिरीक्षक आशुतोष कुमार यांन सांगितले की, गुप्तचर यंत्रणेला मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल समद व इलियास हे दोन पाहिजे असलेले दहशतवादी उत्तर प्रदेशात घुसले असून ते नेपाळच्या सीमेवरून पळून जाऊ शकतात. त्यामुळे भारत - नेपाळ सीमेवरील सिद्धार्थनगर जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.त्याचप्रमाणे, महाराजगंज, कुशीनगर आणि सिद्धार्थनगरसह नेपाळच्या सीमेवरील जिल्ह्यांत पोलिसांनी सतर्क होऊन बंदोबस्त वाढवला आहे. गुप्तचर यंत्रणांच्या म्हणण्यानुसार, हे दहशतवादी भारत - नेपाळ सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातून नेपाळमध्ये पळून जाऊ शकतात. त्यांच्या शोधार्थ संपूर्ण गोरखपूर झोनमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

दहशतवादी शेवटचे सिलिगुडीमध्ये दिसले होतेहे दोन दहशतवाद्यांना पश्चिम बंगालच्या सिलीगुडी येथे शेवटचे दिसले होते. हे दोघेही आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटना आयएसशी संबंधित असल्याचे सांगितले जात आहे. हे दोघेही उत्तर प्रदेशात दाखल झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे आणि हे दोघेही भारत - नेपाळ सीमेला लगत असलेल्या जिल्ह्यामार्गे नेपाळमध्ये पलायन केले असावेत अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

टॅग्स :terroristदहशतवादीUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसIndiaभारतNepalनेपाळBorderसीमारेषा