रस्त्यात रडणाऱ्या मुलांना मदत करताय? थांबा! गुन्हेगारीचं नवं रॅकेट, असं अडकवतात जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 11:53 AM2024-04-01T11:53:45+5:302024-04-01T12:02:06+5:30

एखाद्या चिमुकल्याला माणुसकीच्या नात्याने मदत करणं आपल्यालाच आता अडचणीत आणू शकतं. अनेकदा भाजी मार्केट, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप यासारख्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलं दिसतात.

Helping crying children on the street is dangerous The new racket of crime NCIB alert women | रस्त्यात रडणाऱ्या मुलांना मदत करताय? थांबा! गुन्हेगारीचं नवं रॅकेट, असं अडकवतात जाळ्यात

रस्त्यात रडणाऱ्या मुलांना मदत करताय? थांबा! गुन्हेगारीचं नवं रॅकेट, असं अडकवतात जाळ्यात

देशात अनेक धक्कादायक घटना घडत असतात. अशाच काही उदाहरणावरुन अनेकदा महिला सुरक्षिततेचा प्रश्न देखील ऐरणीवर आलेला दिसतो. सरकार आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने महिला सुरक्षिततेसाठी पावलं उचलली जातात. पण गुन्ह्यांवर आळा घालणं थोडं कठीणच असल्याचं पाहायला मिळतं. याच दरम्यान आता खळबळजनक माहिती समोर आली आहे. 

एखाद्या चिमुकल्याला माणुसकीच्या नात्याने मदत करणं आपल्यालाच आता अडचणीत आणू शकतं. अनेकदा भाजी मार्केट, रेल्वे स्टेशन, बस स्टॉप यासारख्या सार्वजनिक ठिकाणी लहान मुलं दिसतात. ती रडत असल्याचं दिसताच आपल्याला त्यांची दया येते आणि आपण मदतीसाठी पुढाकार घेतो. त्यांची आपुलकीने चौकशी करतो. पण असं करणं आता महिलांना आणि मुलींना महागात पडत आहे. अशा प्रकारे गुन्हेगार त्यांना आपल्या जाळ्यात अडकवत आहेत. 

नॅशनल क्राईम इन्व्हेस्टिगेशन ब्युरो या एनजीओने मुलींना, महिलांना याबाबत अलर्ट केलं आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट करून त्यांनी नव्या फसवणुकीच्या प्रकाराची माहिती दिली. "अतिशय महत्वाची माहिती - हा संदेश त्या मुली/महिलांसाठी आहे ज्या शाळा/कॉलेज/ऑफिस किंवा बाजारात एकट्या जातात. रस्त्यामध्ये एखादं मूल एकटं आणि रडताना दिसलं. तुम्हाला मुलाने त्याच्या घरचा पत्ता दाखवला किंवा तुम्हाला त्या पत्त्यावर सोडण्यास सांगितलं, तर मुलाने दिलेल्या, सांगितलेल्या पत्त्यावर जाऊ नका"

"पोलीस हेल्पलाईन 100/112 वर लगेचच कॉल करून पोलिसांची मदत घ्या. लक्षात ठेवा की, मुलाने दिलेल्या पत्त्यावर जाऊ नका. हे तुम्हाला अडचणीत आणू शकतं. कारण, मुलींचं अपहरण/बलात्कार करणे किंवा खंडणी मागणे हा ज्यांचा व्यवसाय आहे अशा गुन्हेगारांच्या टोळ्यांची ही नवीन पद्धत आहे" असं एनसीआयबीने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. अशा फसवणुकीपासून बचाव करण्यासाठी मुलींनी नेहमीच सतर्क राहणं गरजेचं आहे. 
 

Web Title: Helping crying children on the street is dangerous The new racket of crime NCIB alert women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.