शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नैसर्गिक मृत्यू होणाऱ्या पोलिसांच्या वारसांनाही आता मिळणार अर्थसहाय्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2019 19:03 IST

तातडीने ५० हजाराचे अनुदान; दोन लाखांवर पोलीस कुटुंबियांना दिलासा

ठळक मुद्दे विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांना शासनातर्फे विविध स्वरुपाची मदत दिली जात होती. पोलीस महासंचालक विशेष सहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाणार आहे.

जमीर काझीमुंबई - ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय' या बिरुदावलीने राज्यातील कायदा व सूव्यवस्था अबाधित राहण्यासाठी अहोरात्र कार्यरत असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील दोन लाखांवर पोलीस आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी एक दिलासा देणारी बातमी आहे. सेवेत कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदारांना नैसर्गिक मृत्यू आल्यास त्यांच्या वारसांना ५० हजाराची मदत दिली जाणार आहे. पोलीस महासंचालक विशेष सहाय्यता निधीतून हे अनुदान तातडीने दिले जाणार आहे.

पोलीस शिपाई ते सहाय्यक फौजदार या दर्जापर्यतच्या अंमलदारांच्या वारसांना ही मदत दिली जाणार आहे. दिवंगतांच्या वारसांना शासनातर्फे दिल्या जाणाऱ्या निधी,मदती व्यतिरिक्त ही रक्कम मदत म्हणून दिली जाणार आहे. त्याची अंमलबजावणी तातडीने करण्यात यावी, असे आदेश पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयसवाल यांनी राज्यातील सर्व पोलीस घटक प्रमुखांना दिले आहेत.

‘ऑनड्युटी’ विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांना शासनाकडून वेगवेगळे अनुदान, विमाच्या रक्कम तसेच पोलीस कल्याणनिधीतून विविध स्वरुपात मृताच्या वारसांना मदत दिली जाते. मात्र, अंमलदार जर नैसर्गिकपणे निधन पावल्यास त्यांच्या वारंसाना पोलीस कल्याण निधीतून अत्यल्प मदत दिली जात होती. त्यामुळे या रक्कमेच्या स्वरुपात वाढ करण्यात यावी, अशी मागणी केल्या कित्येक वर्षापासून अंमलदार वर्गातून केली जात होती. मात्र त्याबाबत सकारात्मक निर्णय घेतला जात नव्हता.

गेल्या महिन्यात ७ नोव्हेंबरला महासंचालक सुबोधकुमार जायसवाल यांच्या अध्यक्षतेखालील झालेल्या विशेष सहाय्यता निधीच्या बैठकीमध्ये हा विषय उपस्थित झाला. त्यावेळी जायसवाल यांनी अशा प्रकारे मृत्यूमुखी पडणाऱ्या पोलिसांचे कुटुंबिय आर्थिक विवंचनेत सापडलेले असतात. त्यामुळे त्यांना तातडीने मदत मिळणे आवश्यक असल्याने त्यांच्या वारसांना ५० हजार रुपये देण्याचा निर्णय घेतला आहे. जेणेकरुन या निधीतून संबंधित वारसांना सहाय्य मिळेल, त्याशिवाय शासनाकडून,विमा कंपन्यांकडून दिली जाणारी मदत, वेल्फअर कल्याण निधीतून दिले जाणारे सानुग्रह ,अनुदानही निर्धारित मुदतीमध्ये दिली जावी, अशा सूचना महासंचालकांनी पोलीस घटक प्रमुखांना दिल्या आहेत.

हा निधी मृत्यूमुखी अंमलदाराच्या कायदेशीर वारसाला मिळण्यासाठी संबंधित पोलिसांचे मृत्यूचे प्रमाणपत्र, त्यांच्या कायदेशीर वारसदारांच्या नोंदीबाबतचा अभिलेख, घटक प्रमुखांच्या बॅँक खातेबाबतचा सविस्तर तपशील, त्यासाठीची शिफारस तातडीने पोलीस प्रमुखांनी महासंचालक कार्यालयात पाठवावयाची आहे. त्यानंतर हा निधी संबंधित वारसदारांना दिला जाणार आहे. त्याशिवाय नक्षलग्रस्त भागात, किंवा ड्युटीवर असलेल्या ठिकाणी शत्रुंशी, समाजकंटकांबरोबर प्रतिकार करताना हौतात्म्य पत्करलेल्या पोलिसांना त्या त्या घटनेनुसार निश्चित केलेली रक्कम दिली जाणार आहे. त्यामध्ये कोणताही बदल करण्यात आलेले नसल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

विविध घटनांमध्ये मृत्यूमुखी पडलेल्या पोलिसांना शासनातर्फे विविध स्वरुपाची मदत दिली जात होती. मात्र नैसर्गिकपणे निधन पावणाऱ्यांच्या वारसांना निर्धारित स्वरुपाशिवाय अशा कोणताही लाभ मिळत नसतो. त्यामुळे त्यांच्यासाठी ५० हजार रुपये अनुदान दिल्याने बिकट प्रसंगी त्यांना थोडाफार हातभार मिळणार आहे. या निर्णयाची अंमलबजावणी तातडीने केली जाणार आहे. - सुबोधकुमार जायसवाल (पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य) 

नक्षलग्रस्त भागात किंवा अतिरेक्यांसाठी लढताना धारार्तीथ पडलेल्या पोलिसांच्या कुटुंबियांना लाखोंचा निधी, त्याचप्रमाणे संबंधित अंमलदाराच्या निवृत्तीपर्यत दरमहा वेतन, पदवाढ व भत्ते दिले वारंसांना दिले जातात. मात्र, नैसर्गिक निधन पावलेल्यांना अशी कोणतीही भरीव मदत दिली जात नव्हती, त्यामुळे या निधीमुळे आता वारंसाना थोडा हातभार लाभणार आहे.

 

 

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रDeathमृत्यू