शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

हृदयद्रावक! एकाच कुटुंबातील पाचजणांची हत्या; परिसरात पसरली शोककळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2020 20:14 IST

या घटनेनं प्रयागराजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देतिवारी कुटुंबातील पाचजणांची हत्या कोणी केली, याबाबतची अद्याप छडा लागलेला नाही.  याप्रकरणी सोरांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले आहेत.

अलाहाबाद - प्रयागराज येथील युसूफपूर गावात ह्रदयद्रावक घटना घडली आहे. घरात झोपेत असताना दोन चिमुकल्यांसह विजयशंकर तिवारी त्यांचा मुलगा आणि सून यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. एकाच कुटुंबातील पाचजणांच्या हत्येमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी सोरांव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनं प्रयागराजमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.विजयशंकर तिवारी यांच्या कुटुंबात सोनू (32) हा सगळ्यात मोठा मुलगा होता. त्याची पत्नी कामिनी उर्फ सोनी (28) आणि दोन लहान मुले कान्हा (6) आणि कुंज (3) हे होते. शनिवारी रिक्षाचालक असलेला सोनू घरी आला. सोनू रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाची खळगी भरतो. नेहमी सकाळी लवकर उठून कामाला जात असे. मात्र, रविवारी सकाळी तिवारी कुटुंबातील कोणीही उठलं नाही. त्यामुळे त्यांच्या शेजारी राहणारी मुन्नी देवी या तिवारी यांच्या घरी गेल्या. त्या महिलेने दरवाजा उघडताच तिच्यासमोर पाच मृतदेह पाहायला मिळाले. हे ह्रदयद्रावक दृश्य पाहताच तिने आरडाओरडा करून शेजाऱ्यांना बोलावले. स्थानिकांनी पोलिसांनी माहिती देताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला असून फॉरेन्सिक पथकाने पुरावे गोळा केले आहेत.

पोलीस अधिकारी घटनास्थळी गेले, त्यावेळी दुसऱ्या खोलीत कामिनी आणि तिच्या लहान मुलाचा मृतदेह मिळाला. त्यानंतर आतल्या खोलीत विजयशंकर तिवारी यांचीही हत्या करण्यात आली होती. संपूर्ण कुटुंबाचा अत्यंत निर्दयीपणे अंत करण्यात आला. पोलिसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेतले. मात्र, मृतांच्या नातेवाईकांनी त्यांचे दूरचे नातेवाईक आल्याशिवाय अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. अखेर सर्व नातेवाईक आल्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, तिवारी कुटुंबातील पाचजणांची हत्या कोणी केली, याबाबतची अद्याप छडा लागलेला नाही. 

टॅग्स :MurderखूनUttar Pradeshउत्तर प्रदेशPoliceपोलिसFamilyपरिवार