हृदयद्रावक! एअरफोर्स ऑफिसर राहिलेल्या पतीने विष घेतले, हॉस्पिटलमधून परतल्यावर पत्नीनेही आत्महत्या केली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2023 12:54 IST2023-03-02T12:54:02+5:302023-03-02T12:54:31+5:30
दक्षिण दिल्लीच्या पॉश भागातील डिफेन्स कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हवाई दलात अधिकारी राहिलेल्या अजयपाल (37) यांनी आत्महत्या ...

हृदयद्रावक! एअरफोर्स ऑफिसर राहिलेल्या पतीने विष घेतले, हॉस्पिटलमधून परतल्यावर पत्नीनेही आत्महत्या केली
दक्षिण दिल्लीच्या पॉश भागातील डिफेन्स कॉलनीमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. हवाई दलात अधिकारी राहिलेल्या अजयपाल (37) यांनी आत्महत्या केल्यानंतर त्यांची पत्नी मोनिकानेही (३२) आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. दोघांनीही घरीच विषारी पेय पिऊन आत्महत्या केली.
मोनिकाने रात्री पतीला बेशुद्धावस्थेत एका खोलीमध्ये पाहिले, अजयपालच्या तोंडातून फेस येत होता. यामुळ तिने त्याला तातडीने हॉस्पिटलला नेले. डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यानंतर पत्नीने घरी येऊन अजयपालने जे विष घेतलेले ते प्राशन केले. पोलीस जेव्हा तिच्या घरी पोहोचले तेव्हा आतून काहीच प्रतिसाद येत नव्हता म्हणून दरवाजा तोडण्यात आला. य़ा दोघांच्याही आत्महत्येचे कारण समोर आलेले नाही.
पहाटे साडेचार वाजता पोलिसांना आत्महत्येची माहिती मिळाली होती. हवाई दलातून अजयपालने राजीनामा दिला होता. त्यांचे १ वर्षापूर्वीच लग्न झाले होते. या घटनेने हवाई दलात देखील खळबळ उडाली आहे.