धारावी पॅटर्नमध्ये योगदान करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रमेश नांगरे यांचं हार्ट अटॅकने निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 11, 2021 06:53 PM2021-03-11T18:53:44+5:302021-03-11T18:54:22+5:30

Police Officer Ramesh Nangre passed Away : सध्या साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक असलेले रमेश नांगरे यांच्यावर काळाने झडप घातली आहे.

Heart attack on dutiful police officer Ramesh Nangre who contributed to Dharavi pattern | धारावी पॅटर्नमध्ये योगदान करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रमेश नांगरे यांचं हार्ट अटॅकने निधन

धारावी पॅटर्नमध्ये योगदान करणाऱ्या कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी रमेश नांगरे यांचं हार्ट अटॅकने निधन

googlenewsNext
ठळक मुद्दे दोन महिने पत्नी- मुलांना न भेटता ड्युटी बजावली होती. कोरोना पँडेमिकला वर्षही पूर्ण होतं असताना नांगरे यांच्या मृत्यूची आलेली ही बातमी धक्कादायक आहे.

मुंबईत कोरोना महामारीने हैदोस घातलेला असताना धारावी परिसरात कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणावर आढळून येत होते. धारावी हा परिसर हा हॉटस्पॉट बनला होता. त्यावेळी धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून उत्कृष्ट कामगिरी रमेश नांगरे यांनी केली. सध्या साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून नेमणूक असलेले रमेश नांगरे यांच्यावर काळाने झडप घातली आहे. त्यांचे हृदयविकाराच्या झटक्याने आज निधन झाले आहे.

कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणावर असताना धारावी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून काम केलेले रमेश नांगरे यांचं आज सकाळी हार्ट अटॅकने झोपेत असतानाच निधन झालं आहे. काल नाईट ड्युटी करून ते पहाटे घरी आले होते. सध्या ते साकीनाका विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणून काम करत होते. लाॅकडाऊनच्या काळात ज्या धारावी पॅटर्नची चर्चा जगभरात झाली. त्यामध्ये नांगरे यांचंही योगदान होतं. दोन महिने पत्नी- मुलांना न भेटता ड्युटी बजावली होती. कोरोना पँडेमिकला वर्षही पूर्ण होतं असताना नांगरे यांच्या मृत्यूची आलेली ही बातमी धक्कादायक आहे.

Web Title: Heart attack on dutiful police officer Ramesh Nangre who contributed to Dharavi pattern

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.