शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडोनेशियाच्या माउंट लेवोटोबी लाकी येथे ज्वालामुखीचा उद्रेक, हवेत १० किमी उंचीपर्यंत धुराचे ढग
2
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
3
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
4
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
5
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
6
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
7
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
8
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
9
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
10
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
11
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
12
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
13
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
14
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
15
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
16
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
17
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
18
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
19
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

डोक्यावर हातोड्याने घाव, चाकूने गळा आणि तोंड कापले, दातही तोडले... पत्नीची हत्या करून पतीनेच पोलीस स्टेशन गाठले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2022 21:57 IST

Murder case : पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.

उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये पतीने पत्नीची निर्घृण हत्या केली. या व्यक्तीने पत्नीच्या डोक्यावर हातोड्याने घाव घेतले आणि नंतर तिचा गळा चिरून खून केला. खून केल्यानंतर आरोपीने स्वत: पोलीस ठाणे गाठून गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे.वास्तविक, मेरठच्या कंकरखेडा पोलीस स्टेशन परिसरातील शिवलोक पुरी येथील रहिवासी देवेंद्र सिंह याचे लग्न प्रतिमासोबत झाले होते. त्यांना 10 वर्षांचा मुलगाही आहे. प्रतिमा सरधना येथील नानू गावातील प्राथमिक शाळेत सरकारी शिक्षिका होत्या. पती-पत्नीमध्ये अनेकदा वाद होत होते. पतीही दारू प्यायचा आणि अनेकदा पती-पत्नीमध्ये भांडण व्हायचे, हाणामारीपर्यंत परिस्थिती पोहोचल्याचे सांगण्यात येत आहे.10 वर्षीय मुलगा आशू याने सांगितले की, तो सकाळी मोबाईलमध्ये गेम खेळत होता, यासाठी आईने त्याला शिवीगाळ केली आणि शाळेचा गृहपाठ पूर्ण केला नाही म्हणून मारहाण केली. इतक्यात त्याचे वडीलही तिथे पोहोचले. वडिलांचे डोके दुखत होते. मुलाच्या मारहाणीवरून पती-पत्नीमधील वाद वाढला.मुलाच्या म्हणण्यानुसार, वडिलांनी आईच्या डोक्यावर मागून हातोड्याने वार केले आणि नंतर चाकूने पत्नीचा गळा आणि तोंड कापले. मुलाच्या म्हणण्यानुसार त्याने आपल्या पत्नीचे सर्व दात हातोड्याने तोडले. मुलाने सांगितले की, तो वडिलांना आईला सोडण्यासाठी विनवणी करत होता पण वडिलांनी मुलाला खडसावले आणि गप्प बसण्यास सांगितले आणि पत्नीला मारले आणि तिला ब्लँकेटने झाकले.पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने मुलासह पोलिस ठाणे गाठले आणि तेथे जाऊन पोलिसांना संपूर्ण प्रकार सांगितला. पोलीस त्याच्या घरी पोहोचले जिथे खोलीत महिलेचा मृतदेह पडलेला होता. पोलिसांनी घटनास्थळावरून हत्येसाठी वापरलेला चाकू आणि हातोडाही जप्त केला आहे. माहिती मिळताच फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली.एसपी सिटी विनीत भटनागर सांगतात की, पत्नीची हत्या केल्यानंतर पती स्वत: पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला असून चौकशीत त्याने सांगितले की, कोरोनाच्या काळात त्याचा व्यवसाय संपुष्टात आला होता, त्यामुळे वाद झाला होता, गुन्हा नोंदवून तपास करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशDeathमृत्यूPoliceपोलिस