शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

साप चावल्याचा केला होता बनाव, पत्नीच्या डोक्यात लाकूड घालून खून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 17:41 IST

Murder Case : विठाबाई नामदेव जाधव (४९, रा. कुशेळावाडी ता. मानगाव जि.रायगड ह.मु. खर्दे ता. धरणगाव ) असे मृत महिलेचे  तर नामदेव रामा जाधव (५१ ) असे आरोपी पतीचे नाव आहे. 

धरणगाव जि. जळगाव  :  पत्नीच्या डोक्यात लाकूड टाकून तिचा खून केल्याची घटना खर्दे ता. धरणगाव येथे रविवारी सकाळी उघडकीस आली. आरोपी पतीस अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे पत्नीला साप चावल्याचा बनाव करुन पतीने तिला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते.  चेहऱ्यावर झालेली मारहाणीवरुन पोलिसांनी या खुनाचा छडा लावला. विठाबाई नामदेव जाधव (४९, रा. कुशेळावाडी ता. मानगाव जि.रायगड ह.मु. खर्दे ता. धरणगाव ) असे मृत महिलेचे  तर नामदेव रामा जाधव (५१ ) असे आरोपी पतीचे नाव आहे. 

 नामदेव  याच्यासह विठाबाई ही  खर्दे येथील विटभट्टीवर काम करून उदरनिर्वाह करीत होती.  गुरुवार ३० डिसेंबर रोजी सायंकाळी नामदेव याने विठाबाईस विटभट्टीसाठी कोळसा आणि गवत आणायला सांगितले.  यावरुन दोघांमध्ये वाद झाला.  विठाबाई ही दारु प्यालेली असल्याने ती नामदेव यास शिवीगाळ करीत होती.  यामुळे नामदेव याने रागाच्या भरात जवळ पडलेला लाकडी दांडा उचलून विठाबाईच्या डोक्यात टाकला आणि मारहाणही केली.  नामदेव याने पत्नीला साप चावल्याचा बनाव करून धरणगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. नंतर तिला जळगावच्या जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तिथे रात्री तीचा मृत्यू झाला. 

दरम्यान,  चेहऱ्यावरील घाव व मारहाण याचा प्राथमिक अंदाज पाहून पोलिसांनी संशय व्यक्त केला होता. याप्रकरणी शनिवार १ रोजी  पोलिसांनी नामदेव यास ताब्यात घेत चौकशी केली.  त्याने गुन्ह्याची कबुली दिली. याप्रकरणी संशयित आरोपी नामदेव जाधव याच्या विरोधात रविवारी सकाळी  धरणगाव पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश अहिरे करीत आहे.

टॅग्स :Deathमृत्यूJalgaonजळगावPoliceपोलिसArrestअटक