उत्तर प्रदेशातील लखनौ येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील गोमतीनगरमधील विनयखंड येथे एक दूध विक्रेता दुधात थुंकून ते वितरित करत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये, संबंधित दूध विक्रेता प्रथम घराची बेल वाजवतो, यानंतर कॅनचे झाकण उघडून कॅन तोंडाच्या अगदी जवळ घेतो आणि नंतर पुन्हा कॅन बंद करतो, असे दिसत आहे. हा संपूर्ण प्रकार सीसी टीव्हीमध्ये कैद झाल्यानंतर, पीडित ग्राहकाच्या तक्रारीवरून गोमती नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी दूधवाल्याला अटक केली आहे.
गोमतीनगरमधील विनयखंड येथील रहिवासी सनातन हिंदू महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष लव शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, मल्हौर येथील रहिवासी पप्पू उर्फ मोहम्मद शरीफ गेल्या अनेक वर्षांपासून त्यांच्या घरी दूध देत होता.
लव शुक्ला यांच्या आरोपानुसार, रोजच्याप्रमाणे शनिवारी सकाळी ११ वाजता शरीफ दूध घेऊन घरी आला. त्याने त्याची बाईक घरासमोर उभी केली. गेट बंद होते, म्हणून त्याने बेल वाजवली. घरातून कोणीही बाहेर पडण्यापूर्वीच शरीफने दुधाच्या कॅनचे झाकण उघडले, यानंतर, कॅन तोंडाजवळ घेतली आणि त्यात थुंकला. यानंतर, हे दूध देऊन तो निघून गेला.
काय म्हणाले, गोमतीनगरचे निरीक्षक ब्रजेश चंद्र तिवारी? - यासंदर्भात माहिती देताना गोमतीनगरचे निरीक्षक ब्रजेश चंद्र तिवारी म्हणाले, शनिवारी दुधाच्या डब्यात थुंकल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. पीडित लव शुक्ला यांच्या तक्रारीवरून, दूधाच्या डब्यात थुकून आणि ते दूषित करून विकण्याचा गुन्हा दाखल करून आरोपी मोहम्मद शरीफला अटक करण्यात आली आहे.दूध विक्रेत्या शरीफचा व्हिडिओ -