हो! मी सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करायचो, NCBच्या चौकशीत मिरांडाने दिली कबुली

By ऑनलाइन लोकमत | Published: September 4, 2020 08:42 PM2020-09-04T20:42:04+5:302020-09-04T20:44:01+5:30

Sushant Singh Rajput Case : सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले.

He used to buy drugs for Sushant, confessed the NCB interrogator Miranda | हो! मी सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करायचो, NCBच्या चौकशीत मिरांडाने दिली कबुली

हो! मी सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करायचो, NCBच्या चौकशीत मिरांडाने दिली कबुली

Next
ठळक मुद्देएनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोविक आणि मिरांडा यांना शुक्रवारी अटक केली जाणार नाही. एनसीबीकडे पुरावे आहेत, त्या आधारे या लोकांची चौकशी केली जात आहे.

अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांच्या मृत्यूच्या प्रकरणात ड्रग कनेक्शन उघडकीस आल्यानंतर चौकशीदरम्यान एनसीबी सतत कारवाई करत आहे. एनसीबीच्या पथकाने शुक्रवारी शोविक आणि सॅम्युअलच्या घरी छापा टाकला. यानंतर शोविक आणि सॅम्युअलला एनसीबीच्या मुंबई कार्यालयात आणण्यात आले, जिथे त्यांची चौकशी केली जात आहे. यावेळी सॅम्युअल मिरांडा याने अधिकाऱ्यांना सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी करत असल्याचे सांगितले.

एनसीबीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शोविक आणि मिरांडा यांना शुक्रवारी अटक केली जाणार नाही. त्यानंतर एनसीबी त्यांना चौकशीसाठी बोलावेल. एनसीबी कार्यालयात मुंबई शोविक आणि सॅम्युअल मिरांडाची चौकशी करत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केलेल्या चौकशीत सॅम्युअल मिरांडाने सुशांतसाठी ड्रग्ज खरेदी केल्याचे उघड केले आहे.

शोविक आणि मिरांडा यांच्या चौकशीदरम्यान ड्रग्सची खरेदी-विक्री सुरू होती असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, आतापर्यंत चौकशीत कोणतेही मोठे नाव समोर आले नाही. पण काही ड्रग पेडलर्सची नावे समोर आली आहेत. रिया चक्रवर्ती हिची अद्याप चौकशी केली गेली नाही. रियाची अद्याप चौकशी होणे बाकी आहे. मात्र, एनसीबीकडे असलेल्या रेकॉर्डनुसार रियाही ड्रग्जचे सेवन करीत असे. शोविकने ड्रग्ज केवळ नफ्यासाठी विकत असल्याचं काबुल केलेले नाही. एनसीबी या प्रकरणाचा तपास करत आहे. एनसीबीकडे पुरावे आहेत, त्या आधारे या लोकांची चौकशी केली जात आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

खळबळजनक! भाजपा पदाधिकाऱ्याच्या मुलाची चाकूने वार करून हत्या, हल्लेखोर फरार

 

सुशांतच्या चॅटमधून मोठा खुलासा, बहिणीने एंजाइटी-डिप्रेशनचे औषध घेण्यासाठी दिला होता सल्ला

 

Sushant Singh Rajput Case : रियाला शवगृहात जाण्यासाठी परवानगी दिलीच नव्हती, कूपर रुग्णालयाचा खुलासा

 

बापरे! ९० हजाराहून अधिक तरुणांनी २०१९ मध्ये केली आत्महत्या, पहा NCRB चा अहवाल

 

महिलांवरील अत्याचारांच्या गुन्ह्यात वाढ, सीआयडीचा क्राईम इन महाराष्ट्र २०१८ अहवाल जाहिर

Web Title: He used to buy drugs for Sushant, confessed the NCB interrogator Miranda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.