शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

गर्लफ्रेंडकडे गिफ्ट दिलेला स्मार्टफोन मागू लागला, नकार दिल्यावर बॉयफ्रेंडने केली हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2022 21:21 IST

Murder Case : प्रेयसीला मोबाईल त्याला परत करण्यास सांगितले असता प्रेयसीने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केली.

झारखंडमधील पाकूरमध्ये मोबाईल परत न केल्याने प्रियकराने प्रेयसीची निर्घृण हत्या केली. हे प्रकरण महेशपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रियकराने प्रेयसीला स्मार्टफोन भेट दिला होता. त्याने प्रेयसीला मोबाईल त्याला परत करण्यास सांगितले असता प्रेयसीने नकार दिला. त्यामुळे संतापलेल्या प्रियकराने प्रेयसीची हत्या केली.पोलिसांनी सांगितले की, मृत मुलगी तिच्या २० वर्षीय प्रियकरासह फुटबॉल सामना पाहण्यासाठी बाहेर गेली होती. मात्र त्यानंतरही ती घरी परतली नाही. त्यानंतर सोमवारी प्रेयसीचा मृतदेह घराजवळील निर्जन ठिकाणी पडलेला आढळून आला. दोघेही गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याचे मृताच्या नातेवाईकांनी सांगितले. आरोपी अनेकदा मुलीच्या घरी येत असे. मात्र, काही दिवसांपूर्वी आरोपीच्या पालकांनी त्याचे लग्न इतरत्र निश्चित केले होते. तेव्हापासून आरोपी प्रेयसीला भेट दिलेला स्मार्टफोन परत करण्यास सांगत होता. मात्र मुलीने फोन परत करण्यास नकार दिला. रविवारीही याच गोष्टीवरून त्यांच्यात जोरदार वादावादी झाली.आरोपीने गुन्ह्याची कबुली दिलीपोलीस अधिकारी नवनीत अँथोनी हेमब्रम यांनी सांगितले की, आरोपीने चौकशीदरम्यान गुन्ह्याची कबुली दिली आहे. फुटबॉलचा सामना पाहून दोघे परत येत असताना त्याने प्रेयसीवर धारदार वस्तूने हल्ला केल्याचे त्याने सांगितले. यात प्रेयसीचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर प्रियकर स्मार्टफोन घेऊन पळून गेला. पोलिसांनी आरोपीला कंकरबोना येथून अटक केली आहे आणि मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी सदर हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMobileमोबाइलArrestअटकDeathमृत्यू