शहरं
Join us  
Trending Stories
1
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
2
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार
3
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
4
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
5
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
6
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
7
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
8
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
9
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
10
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
11
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
12
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
13
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
14
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
15
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
16
अभिनेते क्षितीज झारापकर यांचे निधन, ५४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
करिअरच्या उच्च शिखरावर असताना सोडलं बॉलिवूड; लारा दत्ता म्हणाली, 'वाढत्या वयासोबत...'
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
'तेजस्वी सूर्या गुंडगिरी करतात, मासे खातात'; काँग्रेसवर टीका करताना कंगनाने भाजप नेत्याला केलं लक्ष!

अजाणतेपणातून त्याने आदळला बॉम्ब...अहमदनगरजवळील स्फोटात महिलेसह तरुण जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2021 4:53 PM

Bomb Blast : बुधवारी सायंकाळी शेतात गवत काढण्यासाठी आलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना हा बाॅम्ब गोळा सापडला.

ठळक मुद्दे मंदाबाई बाबासाहेब फुंदे व अक्षय साहेबराव मांडे असे स्फोटात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर परिसरातील चार किलोमीटर अंतरावर आवाज गेला.

अहमदनगर: नगर तालुक्यातील नारायणडोह गावातील शेतात सापडलेल्या बॉम्बचा स्फोट होऊन महिलेसह एक तरुण जखमी झाला. बुधवारी (दि. २८) सायंकाळी ही घटना घडली. मंदाबाई बाबासाहेब फुंदे व अक्षय साहेबराव मांडे असे स्फोटात जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. बॉम्बचा स्फोट झाल्यानंतर परिसरातील चार किलोमीटर अंतरावर आवाज गेला. हा बॉम्ब जुन्या काळातील असल्याने स्फोट झाला तेव्हा त्याचा भडका उडाला नाही केवळ छरेरे उडून आवाज झाला. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. नगर तालुक्यातील नारायणडोह येथे गावापासून दूर राहणाऱ्या बाबासाहेब रामराव फुंदे यांच्या वस्तीवर जाण्यासाठी रस्त्यावर काही दिवसांपूर्वी मुरूम टाकण्यात आला होता. या मुरुमात पिन असणारा जुन्या काळातील बॉम्ब होता. 

बुधवारी सायंकाळी शेतात गवत काढण्यासाठी आलेल्या फुंदे यांच्या पत्नी मंदाबाई यांना हा बाॅम्ब गोळा सापडला. त्यांनी तो बाॅम्ब गोळा जवळच शेतात काम करत असलेल्या अक्षय साहेबराव मांडे या युवकाकडे दिला. त्याने तो बाॅम्बगोळा जमीनीवर आपटला. यावेळी मोठा स्फोट झाला. यात अक्षय  व मंदाबाई फुंदे हे दोघे जखमी झाले. या घटनेची माहिती मिळताच नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. यानंतर घटनास्थळाची बाॅम्ब शोधक पथकाने पाहणी केली तसेच परिसरात आणखी बॉम्ब आहेत का याचाही शोध घेतला. यावेळी इतर ठिकाणी बॉम्ब आढळून आलेला नाही.शेतात सापडणाऱ्या वस्तूंना ग्रामस्थांनी हात लावू नये.नारायणडोह येथे आढळून आलेला बॉम्ब हा जुन्या काळातील भूसुरुंग असण्याची शक्यता आहे. तपासणीसाठी बॉम्बशोधक पथकाने बॉम्बचे तुकडे ताब्यात घेतले आहेत. शेतात काम करत असताना ग्रामस्थांना काही बॉम्बसदृश्य वस्तू आढळून आली तर त्याला हात न लावता तत्काळ पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन नगर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले आहे.

टॅग्स :Blastस्फोटAhmednagarअहमदनगरPoliceपोलिसWomenमहिला