शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतील स्फोटाचं पुलवामा कनेक्शन समोर, सलमानने काश्मीरमधील तारिकला विकली होती ती कार
2
आजचे राशीभविष्य, ११ नोव्हेंबर २०२५: कामे नक्की पूर्ण होतील, पण 'या' राशीने आळस टाळा !
3
दिल्लीत 'फिदायिन' हल्ल्याची शक्यता; स्फोट घडवण्यापूर्वी कारमध्ये दिसलेला संशयित डॉक्टर उमर
4
बिहारमध्ये दुसऱ्या टप्प्यासाठी आज मतदान, २० जिल्हे, १२२ मतदारसंघ, ३.७ कोटींवर मतदार
5
दिल्लीतील स्फोट हा आत्मघाती हल्ला? समोर येतेय अशी माहिती, पोलिसांकडून गुन्हा दाखल
6
ना स्फोटाच्या ठिकाणी खड्डा, ना मृतांच्या शरीरात सापडले तारा आणि खिळे, या कारणांनी गुढ वाढवलं
7
दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळ झालेल्या स्फोटातील जखमी आणि मृतांची यादी समोर
8
ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांची प्रकृती चिंताजनक, ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
9
देशातील ७०% कैदी अजूनही दोषी नाहीत, केवळ ८% जणांनाच मिळाली कायदेशीर मदत
10
व्हिडीओत संपादनात चूक, दिशाभूल केल्याचा ठपका, बीबीसीचे प्रमुख संचालक, वृत्त प्रमुखांचा राजीनामा
11
पासवर्ड बदला, अन्यथा डल्ला, ७६ लाख लोकांचा आहे एकच पासवर्ड; पासवर्ड चोरल्यास बसू शकतो फटका
12
निवड समितीसोबतचा पंगा मोहम्मद शमीला भोवणार? कसोटी संघातील पुनरागमन अनिश्चित काळ लांबणीवर जाण्याची शक्यता
13
कंपनीला कर्मचाऱ्यांनीच घातला दीड कोटीचा गंडा, बनावट कॅश व्हाऊचरची छपाई, अतिरिक्त पगार
14
लाल किल्ल्याजवळ कारचा भीषण स्फोट, ८ ठार; 'प्रत्येक अँगलने तपास करा', गृहमंत्री अमित शाह यांचे तातडीचे आदेश!
15
दिल्लीतील ‘ब्लास्ट’, मागील पाच वर्षांतील केरळनंतरचा ठरला सर्वात मोठा स्फोट
16
लाल किल्ल्याजवळ स्फोट, दुर्घटनेनंतर देश हादरला! राहुल गांधी ते शरद पवार... कोण काय म्हणाले?
17
लाल किल्याजवळील स्फोटाने देश हादरला; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमित शाह यांना फोन, पोस्ट करत म्हणाले-
18
Prem Chopra : दिग्गज अभिनेते प्रेम चोप्रा यांच्या प्रकृतीत सुधारणा; लीलावती रुग्णालयात दाखल
19
Red Fort Blast:  कार हळूहळू सिग्नलजवळ येऊन थांबली अन् झाला स्फोट; पोलीस आयुक्तांनी सांगितली घटना
20
लाल किल्ल्याजवळील स्फोटानंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये हाय अलर्ट! तपास यंत्रणा सतर्क

पाहुणा म्हणून आला अन् अत्याचार करून गेला, अल्पवयीन मुलीवर बलात्कार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2020 22:04 IST

Rape : आरोपीस तात्काळ अटक, सहा दिवसाची पोलीस कोठडी 

ठळक मुद्देया घटनेची फिर्याद स्वतः पीडित मुलीने राधानगरी पोलीसात दिली आहे .न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दहा डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .

धामोड -कुरणेवाडी ( ता. राधानगरी ) येथील अल्पसंख्यांक समाजातील १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर पिडीत मुलीच्या भावाच्या सासऱ्यानेच बलात्कार केल्याची घटना काल मध्यरात्री घडल्याचे आज उघडकीस आले. या घटनेची फिर्याद स्वतः पीडित मुलीने राधानगरी पोलीसात दिली आहे. याप्रकरणी आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी उर्फ पठाण (वय४३ ) रा .कोगील बुद्रुक तालुका करवीर याला राधानगरी पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे . न्यायालयासमोर उभे केले असता त्याला दहा डिसेंबरपर्यंतची पोलीस कोठडी देण्यात आली आहे .     घटनेबाबत राधानगरी पोलिसांतून मिळालेली माहिती अशी,  धामोड पैकी कुरणेवाडी ( ता. राधानगरी ) येथील एका अल्पसंख्यांक कुटुंबामध्ये आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी उर्फ पठाण यांची मुलगी देण्यात आली आहे. तो पाहुणा म्हणून कुरणेवाडी येथे आला होता . त्यावेळी पीडित मुलगीचे वडील मासेमारी व्यवसाय निमित्त बाहेर गेले होते . ते मध्यरात्री परतले . यावेळी घरातील सर्व मंडळी झोपलेली होती त्यामुळे तेही जेवण करून झोपी गेले .याच मध्यरात्री आरोपी जमीर खुदबुद्दीन दरवेशी उर्फ पठाण याने पीडित मुलगी एकटीच स्वतःच्या खोलीमध्ये असल्याचे खात्री करून खोलीत तिचे तोंड दाबून धमकी देत तिच्यावरती बलात्कार केला. 'तु चुप बैठ ,अगर चिलाई या घरवालोंको बताया तो जान से मार दुंगा ' अशी धमकी दिली .पहाटे घरातील मंडळी उठण्या अगोदरच त्याने घरातून पोबारा केला. सकाळी मुलीने रात्री  घडला प्रकार आपल्या आईच्या कानावर घातला .

पिडीत मुलगीचे आई वडील व भाऊ यांनी मुलीसह तात्काळ राधानगरी पोलिस स्टेशनची धाव घेत संबंधित आरोपीवर गुन्हा नोंद केला . घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन राधानगरी पोलिसांनी तात्काळ या आरोपीला कोगील बुद्रुक येथून अटक केली आहे . व प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी राधानगरी यांच्या समोर हजर केले असता .न्यायालयाने आरोपीस १० डिसेंबर पर्यंतची पोलीस कोठडी सुनावली. घटनेचा तपास राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उदय डुबल व पोलीस उप निरीक्षक एम .एच.शेख हे करत आहेत . दरम्यान या मुलीच्या शारीरिक तपासणी साठी तिला कोल्हापूर येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयामध्ये पाठविण्यात आले आहेत . अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाईसाठी आरोपीला न्यायालयासमोर पुन्हा हजर केले जाईल . असे राधानगरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक एम .एम.एच.शेख यांनी सांगितले .

 "पाहुणा म्हणून आला आणि अत्याचार करून गेला "         

आरोपी जमीर खुदबुद्दीन उर्फ पठान हा पिडीत मुलगीच्या वडीलांचा व्याही असून त्याची मुलगी पिडीत मुलगीच्या भावाला दिली आहे . मुलगीचे घर बांधण्यासाठी गवंडी घेऊन आला होता . त्याच रात्री जावयाची बहिण एकटीच खोलीत असल्याचे पाहून तिच्यावर बलात्कार करून त्याने पहाटेच पोबारा केला .

टॅग्स :Rapeबलात्कारPOCSO Actपॉक्सो कायदाkolhapurकोल्हापूरPoliceपोलिसArrestअटक