घरात घुसून झोपलेल्या अल्पवयीन मुलीचे बंदुकीचा धाक दाखवून केला बलात्कार 

By पूनम अपराज | Updated: January 11, 2021 19:48 IST2021-01-11T19:47:21+5:302021-01-11T19:48:31+5:30

Rape case: शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने पीडितेच्या घराच्या भिंतीवरून उडी मारली आणि घरात घुसला. त्यावेळी ती झोपेत असताना तिच्यावर बलात्कार केला.

He broke into the house and raped a sleeping minor girl at gunpoint | घरात घुसून झोपलेल्या अल्पवयीन मुलीचे बंदुकीचा धाक दाखवून केला बलात्कार 

घरात घुसून झोपलेल्या अल्पवयीन मुलीचे बंदुकीचा धाक दाखवून केला बलात्कार 

ठळक मुद्देपीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आपल्याबरोबर देशी बनावटीची पिस्तूलही घेऊन होता आणि बंदूकीचा धाक दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला होता.

ग्रेटर नोएडामधील एका १४ वर्षीय मुलीवर शेजार्‍याने तिच्यावर बलात्कार केला. पीडित मुलगी झोपलेली असताना हे दुष्कृत्य करण्यात आले. ग्रेटर नोएडाच्या रबूपुरा भागात ही घटना घडली.ही पीडित मुलगी अल्पवयीन आहे. रात्री आपल्या भावंडांसह ती झोपली होती. असा आरोप केला जात आहे की, त्यांच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने पीडितेच्या घराच्या भिंतीवरून उडी मारली आणि घरात घुसला. त्यावेळी ती झोपेत असताना तिच्यावर बलात्कार केला.

पीडित मुलीच्या कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, आरोपी आपल्याबरोबर देशी बनावटीची पिस्तूलही घेऊन होता आणि बंदूकीचा धाक दाखवून त्याने तिच्यावर बलात्कार केला होता. पीडित मुलगी मदतीसाठी ओक्शाबोक्शी रडल्यामुळे संपूर्ण कुटुंबाला जाग आली आणि त्यांनी आरोपीला पकडले. तासेक्सच त्याला मारहाण केली. या घटनेने ग्रेटर नोएडा पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि आरोपीला अटक करण्यात आली. पीडित मुलीला वैद्यकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर बलात्कार झाल्याची बाब उघड झाली.

Web Title: He broke into the house and raped a sleeping minor girl at gunpoint