भायखळामधील इमारतीजवळ बॉम्ब ठेवल्याचा हॉक्स कॉल;आग्रीपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2022 14:19 IST2022-04-29T14:17:37+5:302022-04-29T14:19:51+5:30
२६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास भायखळा पश्चिमेकडील बी. जे. मार्ग येथे असलेल्या टाटा कॉलनीमध्ये एक व्यक्ती बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या माहितीचा कॉल आला आणि खळबळ उडाली.

भायखळामधील इमारतीजवळ बॉम्ब ठेवल्याचा हॉक्स कॉल;आग्रीपाडा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल
मुंबई : रमजानच्या काळात भायखळा परिसरातील इमारतीजवळ बॉम्ब ठेवण्यात आल्याचा कॉल केल्याने खळबळ उडाली. चौकशीत हा हॉक्स कॉल असल्याचे लक्षात येताच, कॉल करणाऱ्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून आग्रीपाडा पोलीस अधिक तपास करत आहेत.
२६ एप्रिल रोजी पहाटेच्या सुमारास भायखळा पश्चिमेकडील बी. जे. मार्ग येथे असलेल्या टाटा कॉलनीमध्ये एक व्यक्ती बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याच्या माहितीचा कॉल आला आणि खळबळ उडाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत तपासणी केली असता त्यांना बॉम्ब सदृश वस्तू किंवा संशयित वस्तू, व्यक्ती सापडला नाही. अखेर पोलिसांनी कॉल करणाऱ्या व्यक्तीच्या मोबाईल क्रमांकावर कॉल केला.
मागील तीन दिवसांपासून एक व्यक्ती या परिसरात बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगून त्याने कॉल कट केला. पोलिसांनी त्याला पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला असता झोपेत असल्याचे सांगत कॉल कट केला. चौकशीत हा हॉक्स कॉल असल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी गुन्हा नोंदवत अधिक तपास करत आहे.