फेरीवाल्यांची मुजोरी, केडीएमसीच्या कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2021 13:15 IST2021-01-20T13:15:25+5:302021-01-20T13:15:49+5:30
Assaulting : डोंबिवली घरडा सर्कल जवळ ही कारवाई सुरू असताना या कारवाईस विरोध करत फेरीवाला पथकातील काही कर्मचाऱ्यांशी फेरीवाल्यांनी हुज्जत घातली

फेरीवाल्यांची मुजोरी, केडीएमसीच्या कर्मचाऱ्याला फेरीवाल्यांकडून बेदम मारहाण
कल्याण - डोंबिवलीत फेरीवाल्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. रस्त्यावर अतिक्रमण करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात मंगळवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास महापालिकेने कारवाई सुरू केली. डोंबिवली घरडा सर्कल जवळ ही कारवाई सुरू असताना या कारवाईस विरोध करत फेरीवाला पथकातील काही कर्मचाऱ्यांशी फेरीवाल्यांनी हुज्जत घातली पथकाने विरोध न जुमानता कारवाई सुरू करताच या मुजोर फेरीवाल्यांनी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरुवात केली
फेरीवाल्याची मुजोरी, केडीएमसीच्या कर्मचाऱ्याला फेरीवाल्याकडून बेदम मारहाण pic.twitter.com/Xw9QoikLdj
— Lokmat (@MiLOKMAT) January 20, 2021
या पथकातील दोन कर्मचाऱ्यांना फेरीवाल्यांनी बेदम मारहाण केली आहे. या प्रकरणी मानपाडा पोलीस स्थानकात या फेरीवाल्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी महापालिकेचे ई प्रभाग अधिकारी अक्षय गुडधे यांनी फेरीवाल्यांविरोधात कारवाई आणखी तीव्र करणार असल्याचं सांगितलं