Hathras Gangrape : माझ्या मुलाने तर मुलीसाठी पाणी आणले होते, आरोपीच्या आईने दिली माहिती
By पूनम अपराज | Updated: October 9, 2020 19:13 IST2020-10-09T19:07:22+5:302020-10-09T19:13:31+5:30
Hathras Gangrape: इतकेच नव्हे तर आरडाओरडा ऐकून आम्ही सर्वजण तिथे गेलो आणि लवकुशने त्या दिवशी पीडितेला पाणी दिल्याची खळबळजनक माहिती दिली आहे.

Hathras Gangrape : माझ्या मुलाने तर मुलीसाठी पाणी आणले होते, आरोपीच्या आईने दिली माहिती
हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या घटनेसंदर्भात तपासाची व्याप्ती सातत्याने वाढत आहे. राज्य सरकारने तयार केलेल्या एसआयटीने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी अधिक तीव्र केली आहे. या प्रकरणात आता आरोपीच्या आईचे खळबळजनक माहिती समोर आणली आहे. आरोपी लवकुशची आई म्हणाली की, तिचा मुलगा निर्दोष आहे. आरोपीची आई म्हणाली की, मुलांनी पत्रात जे लिहिले ते सत्य आहे. तिचे म्हणणे आहे की, घटनेच्या दिवशी लवकुश तिच्यासोबत शेतात चारा कापत होता. इतकेच नव्हे तर आरडाओरडा ऐकून आम्ही सर्वजण तिथे गेलो आणि लवकुशने त्या दिवशी पीडितेला पाणी दिल्याची खळबळजनक माहिती दिली आहे.
उत्तर प्रदेशच्या हाथरस येथील एका १९ वर्षीय मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीने उत्तर प्रदेशपोलिसांना पत्र लिहिले आहे, असा दावा केला आहे की, या प्रकरणात त्याच्यासह लवकुश, रवी आणि रामू या अन्य तीन आरोपींना दोषी ठरविण्यात आले आहे आणि त्यासाठी “न्याय” मागितला आहे. तसेच मृत मुलीच्या आई आणि भावाने तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप आरोपीने केला.
पीडितेच्या कुटूंबाला आरोपींपैकी एका आरोपीबद्दल माहित असल्याचा पुरावा असल्याचे पोलिसांच्या म्हणण्यानुसार हे पत्र समोर आले आहे. संदीप ठाकूर हा आरोपी इतर तीन आरोपींसह तुरूंगात आहे. त्यांने हाथरसच्या पोलिसांना पत्र लिहिले असून, तो आणि मृत मुलगी "मित्र" असल्याचा दावा केला आहे. “भेटण्याऐवजी आम्ही एकदा फोनवर बोलू लागलो,” असे त्यांनी हिंदी भाषेत हस्तलिखित पत्रात बुधवारी लिहिले. या पत्रात चारही आरोपींचे अंगठा ठसे आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांनी दावा केला होता की, कॉल रेकॉर्डवरून महिलेचा भाऊ संदीप ठाकूर याच्या संपर्कात असल्याचे दिसून आले आहे. गेल्या वर्षी ऑक्टोबर ते मार्च या काळात पीडितेच्या भाऊ आणि संदीप ठाकूर यांच्यात सुमारे 104 कॉल झाले होते, असा पोलिसांनी दावा केला होता. मात्र, आता हे प्रकरण वेगळ्या वळणावर येत असल्याचं दिसत आहे. तर पीडितेची कुटुंबीय आरोपी पळवाटा शोधात असल्याचं सांगत आहेत, अशी माहिती आजतकने दिली आहे.