शहरं
Join us  
Trending Stories
1
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
2
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
3
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
4
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
5
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
6
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
7
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
8
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
9
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
10
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
11
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
12
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
13
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
14
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
15
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
16
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
17
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
18
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
19
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
20
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे फोटो इन्स्टाला टाकले म्हणून सासऱ्याने तोडले हात-पाय; मुलीचे लावून दिलं दुसरं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2025 14:31 IST

पत्नीच्या दुसऱ्या लग्नानंतर सासरच्यांनी पहिल्या पतीला मारहाण केल्याची घटना हरियाणामध्ये घडली.

Haryana Crime: हरियाणाच्या सोनीपथमध्ये मारहाणीची विचित्र घटना समोर आली आहे.  सोनीपतच्या गणौर पोलीस स्टेशन परिसरात प्रेमविवाह करणाऱ्या एका तरुणावर मुलीच्या कुटुंबाने जीवघेणा हल्ला केला. पानिपतच्या एका गावातील कुणालने गेल्या वर्षी कोमलशी रोहिणी न्यायालयात लग्न केले. लग्नानंतर दोघे एकत्र राहत होते, पण कोमल अचानक घरातून निघून गेली. त्यानंतर तिच्या कुटुंबाने उत्तर प्रदेशातील शामली येथे तिचे लग्न लावून दिले. हे प्रकरण सध्या न्यायालयात प्रलंबित आहे, पुढील सुनावणी २५ ऑक्टोबर रोजी होणार आहे. मात्र त्याआधीच कुणालने असं काही तरी केलं ज्यामुळे नवा वाद निर्माण झाला. कुणालने या लग्नासाठी आक्षेप घेतला होता ज्यामुळे कोमलच्या कुटुंबियांनी त्याला बेदम मारहाण केली. 

कुणालचे म्हणणे आहे की त्याने नुकतेच कोमलसोबतचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले. याचा राग आल्याने मुलीच्या कुटुंबाने त्याच्यावर हल्ला केला. २४ सप्टेंबर रोजी कुणाल आणि त्याचे वडील बाईकवरून घरी परतत असताना, बादशाही रोडवर दोन दुचाकींवरून आलेल्या चार ते पाच जणांनी त्याला घेरले आणि काठ्यांनी बेदम मारहाण केली. मुलीचे वडील सतीश आणि काका राकेश यात सहभागी होते. हल्लेखोरांनी कुणालचे हात आणि पाय तोडले, त्यानंतर त्याला पीजीआयमध्ये दाखल करण्यात आले. 

कुणाल आणि २१ वर्षीय कोमल गोस्वामी यांनी २६ जून २०२४ रोजी त्यांच्या कुटुंबाच्या मर्जीविरुद्ध एका मंदिरात लग्न केले. पण त्यांचे प्रेमप्रकरण फार काळ टिकले नाही. लग्नानंतर काही महिन्यांनीच कोमल तिच्या पालकांच्या घरी परतली. कोमलचे पालक सुरुवातीपासूनच माझ्या विरोधात होते. त्यांनी कोमलला तिच्या आजीच्या आजाराचे कारण सांगून परत बोलावले, असं कुणालने म्हटलं. त्यानंतर कोमलने कुणालविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा खटला दाखल केला आणि मासिक ३०,००० रुपयांच्या पोटगी मागतली. महत्त्वाचे म्हणज कुणाल महिन्याला फक्त १२,००० रुपये कमवतो हे कोमलला माहिती होते. त्यानंतर, कोमलच्या कुटुंबाने तिचे दुसरे लग्न लावल्याची बातमी समोर आली. त्यामुळे कुणालने इंस्टाग्रामवर त्याच्या आणि कोमलच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले. ज्याचा कोमलचा कुटुंबियांना प्रचंड राग आला.

वडिलांसह घरी येत असताना कुणावर हल्ला करण्यात आला होता. कोमलचे वडील सतीश यांनी मला इन्स्टाग्रामवरील फोटो डिलीट करण्यास सांगितले. मी विचारले की घटस्फोटाशिवाय कोमल पुन्हा लग्न कसे करू शकते. मग त्यांनी माझ्यावर हल्ला केला, असं कुणालने सांगितले. हल्लेखोरांनी कुणालला काठ्या आणि धारदार शस्त्रांनी मारहाण केली, ज्यामुळे त्याची हाडे मोडली. धक्कादायक म्हणजे, कोमलच्या वडिलांनी हा सगळा प्रकार मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला होता. 

English
हिंदी सारांश
Web Title : Father-in-law attacks man for posting wedding photos; forces second marriage.

Web Summary : Haryana man Kunal was attacked by his in-laws for posting wedding photos after his wife, Komal, was forced into another marriage. Kunal suffered severe injuries, and the father-in-law recorded the assault. The couple had married against family wishes.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीHaryanaहरयाणाPoliceपोलिस