आईने मुलीला सांगितलं - पाणी येत नाहीये, जाऊन टाकी बघ; झाकण उघडलं तर दिसला बहिणीचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2021 12:18 IST2021-10-02T12:16:05+5:302021-10-02T12:18:24+5:30
१७ वर्षीय तन्नु ज्या घरात राहत होती त्याच घराच्या पहिल्या मजल्यावर दुसरी बहीण तिच्या पतीसोबत वेगळ्या रूममध्ये राहत होती.

आईने मुलीला सांगितलं - पाणी येत नाहीये, जाऊन टाकी बघ; झाकण उघडलं तर दिसला बहिणीचा मृतदेह
आपल्याच छतावर ठेवलेल्या पाण्याच्या टाकीमध्ये एका १७ वर्षीय मुलीचा मृतदेह रहस्यमय स्थितीत उलटा पडलेला दिसला. ही घटना हरयाणाच्या यमुनानगर जिल्ह्यातील आहे. परिवाराला याबाबत तेव्हा समजलं जेव्हा नळातून पाणी येणं बंद झालं होतं. मृत मुलीच्या बहिणीनुसार, पाण्याच्या टाकीचं झाकण अर्ध उघडं होतं.
१७ वर्षीय तन्नु ज्या घरात राहत होती त्याच घरात दुसरी बहीण तिच्या पतीसोबत वेगळ्या रूममध्ये राहत होती. आणि नेहमीत ती तिच्या आईसोबत आपल्या बहिणीच्या रूममध्ये रात्री उशीरापर्यंत टीव्ही बघत होती. परिवारानुसार, अनेकदा ती बहिणीच्या रूममध्येच झोपत होती. गेल्या रात्री तन्नु आईसोबत आपल्या बहिणीच्या घरात टीव्ही बघत होती आणि तिने आईला सांगितलं की, तू जा मी इथेच झोपते.
टाकीचं झाकण उघडलं आणि....
सकाळी जेव्हा तन्नुच्या आईने वर राहत असलेल्या मुलीला सांगितलं की, तन्नुला खाली पाठव. तर ती म्हणाली की, ती तर रात्रीच खाली आली होती. कुणाला काही समजेल याआधीच घरातील नळाला पाणी येणं बंद झालं. आईने एका मुलीला सांगितलं की, वर जाऊन टाकी बघून येत. त्यात काही अडकलं असेल. जेव्हा लहान मुलीने टाकी बघितलं तर तिच्या किंचाळीने या प्रकरणाचा खुलासा झाला.
या प्रकरणी सूचना मिळताच पोलिसही घटनास्थळी पोहोचले. आणि मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आला. पोलिसांना सुरूवातीला हे प्रकरण आत्महत्येचं वाटत आहे. अधिकारी म्हणाले की, परिवारातील लोकांचे जबाब नोंदवले आहेत. चौकशी केली जात आहे.