शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
4
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

विवाहितेच्या छळप्रकरणी पती, सासूवर गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 1:55 PM

घरासाठी माहेरून १ लाख रूपये आणण्यासाठी वारंवार त्रास दिला

लोणी काळभोर : लग्नात मानपान केला नाही, तसेच घर बांधण्यासाठी माहेरवरून पैसे न आणल्याच्या कारणावरून वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास दिल्याप्रकरणी पतीसह सासू, जाऊ व नणंदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात सपना विशाल तलरेजा (वय २८, रा. उरुळी कांचन, ता. हवेली, मुळ गाव सिद्धार्थनगर, दौंड) यांनी फिर्याद दिली आहे. तर सासू सुमन भागचंद तलरेजा, पती विशाल भागचंद तलरेजा, नणंद ज्योती प्रमोद थोरात, जाऊ प्रतिभा विजय तलरेजा यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार सपना व विशाल तलरेजा यांचा विवाह २०१५ रोजी  झाला होता. २२ मार्च २०१६ रोजी त्यांना एक मुलगी झाली. माहेरी बाळंतपण झाल्यावर सपना दोन महिने माहेरी गेली होती. ती बाळंतीण झाल्यावर तिला घरासाठी माहेरून १ लाख रूपये आणण्यासाठी वारंवार त्रास दिला. २३ एप्रिल रोजी दुपारी सपना यांच्या बहिणी व वहिनी भेटायला आल्या होत्या. सपना त्यांना घराजवळील गणपती मंदिरात भेटल्या. रात्री ही गोष्ट त्यांनी पतीला सांगितली. न सांगता माहेरच्या लोकांना भेटल्यामुळे पतीने त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली. तुला मारुन टाकतो व मी मरतो असे या वेळी पती म्हणत होते. त्या मुळे घाबरून सपना आपल्या मुलीला घेऊन तेथून निघून गेल्या. त्यामुळे त्यांनी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.           

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस