"वारस दिला नाही, मी तुला खल्लासच करतो"; पत्नीचा छळ, पतीसह दोघांवर गुन्हा!

By रूपेश हेळवे | Updated: July 12, 2023 16:56 IST2023-07-12T16:55:55+5:302023-07-12T16:56:06+5:30

प्रियंका महेश मोरे ( वय ३०, रा. बुधवार पेठ, मिलींद नगर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

Harassment of the wife, a crime against husband with both, solapur | "वारस दिला नाही, मी तुला खल्लासच करतो"; पत्नीचा छळ, पतीसह दोघांवर गुन्हा!

"वारस दिला नाही, मी तुला खल्लासच करतो"; पत्नीचा छळ, पतीसह दोघांवर गुन्हा!

सोलापूर : तू मला वारस दिला नाही, तुला मी खल्लास करतो म्हणत पत्नीचा पैशासाठी छळ केल्याप्रकरणी पती व सासूवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत प्रियंका महेश मोरे ( वय ३०, रा. बुधवार पेठ, मिलींद नगर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादी प्रियंका यांचे महेश शाहू मोरे याच्यासोबत विवाह झाला होता. विवाहानंतर पती व सासू हे दोघे घरातील कामावरून फिर्यादीला घालून पाडून बोलत होते. शिवाय पती काम करत असलेली कंपनी बंद पडल्यानंतर घर बांधण्यासाठी त्याने फिर्यादीला माहेरून आठ लाख रूपये घेऊन येण्यास सांगितले.

फिर्यादीने पाच लाख रूपये आणून दिले. त्यानंतर संशय घेऊन पतीने फिर्यादीला हकलून दिले. शिवाय आरोपी पती सातारा येथे जाऊन फिर्यादीला व दोन मुलींना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. शिवाय तू आम्हाला वारस दिला नाही. मी दुसरे लग्न करणार आहे म्हणत फिर्यादीचे सोन्याचे ऐवज काढून घेत तिला माहेर पाठविले, अशा आशयाची फिर्याद पीडितेने दिली आहे. या प्रकरणी पती महेश मोरे, सासू राधा शाहू मोरे ( दोघे रा. आनंद पार्क, पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Harassment of the wife, a crime against husband with both, solapur