भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग, पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: September 23, 2021 11:55 AM2021-09-23T11:55:55+5:302021-09-23T12:01:16+5:30

Crime News : बोरीवली पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

harassed allegedly by another party activist inside the office of a BJP leader in Mumbai's Borivali on Aug 15 | भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग, पोलिसांत गुन्हा दाखल

भाजपा नगरसेविकेच्या कार्यालयात महिलेचा विनयभंग, पोलिसांत गुन्हा दाखल

Next

मुंबई : मुंबईतील भाजपा महिला नगरसेविकेच्या संपर्क कार्यालयामध्ये पार्टीच्या कार्यकर्त्याने एका महिलेचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भाजपाच्या महिला नगरसेविका अंजली खेडकर यांच्या संपर्क कार्यालयात हा प्रकार घडल्याचे समोर येत आहे. मुंबईतील बोरिवलीत वॉर्ड क्रमांक १६ राम मंदिर रोड वझीरा नाका येथे अंजली खेडकर यांचे कार्यालय आहे. (harassed allegedly by another party activist inside the office of a BJP leader in Mumbai's Borivali on Aug 15.)

बोरीवली पोलीस ठाण्यात विनयभंग केल्याप्रकरणी भाजपा कार्यकर्त्याविरोधात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, देशाच्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्टला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास ही घटना घडली. तक्रार दाखल करुनही, पोलिसांनी महिनाभर दखल न घेतल्याचा महिलेचा आरोप आहे.

तक्रार न करण्यासाठी भाजपा नगरसेविकेने दबाव टाकल्याचा पीडित महिलेचा दावा आहे. तसेच, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या तक्रारीची दखल घेतली नाही आणि अंजली खेडकर यांच्या कार्यालयात आपल्याला मारहाण करुन बाहेर काढण्यात आल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

१५ ऑगस्टला काय घडलं?
१५ ऑगस्टला संध्याकाळी ६.३० च्या सुमारास आरोपीने सदर महिलेला भेटण्यासाठी भाजपा कार्यालयात बोलावले. त्यानंतर आरोपीने कार्यालयाचे शटर बंद केले. लॉक करुन लाईट बंद केली. महिलेने आरोपीला शटर बंद करण्याचे कारण विचारले. त्यावेळी त्याने ऑफिस चालू आहे, हे कोणाला कळू नये, असे कारण दिले. त्यानंतर आरोपीने आपल्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, असे पीडित महिलेने तिच्या तक्रारीत म्हटले आहे.

आरोपीची ओळख कशी झाली?
पीडित महिला बोरिवलीमध्ये रहायला आहे. पीडित महिलेला समाजसेवेची आवड असल्याने ती २०२० मध्ये खेडेकर यांच्या संपर्क कार्यालयात आली होती.  तेव्हा आरोपीशी तिथे ओळख झाली. आपल्याला समाजसेवेची आवड असल्याचे पीडीत महिलेने सांगितले. आरोपीशी ओळख झाल्यानंतर मोबाइल क्रमांकाची देवाण घेवाण झाली. महिलेचा वॉर्डच्या व्हॉट्स अॅप ग्रुपमध्ये समावेश करण्यात आला. त्यातून त्यांना पार्टीच्या कार्यक्रमांची माहिती मिळत होती.

Web Title: harassed allegedly by another party activist inside the office of a BJP leader in Mumbai's Borivali on Aug 15

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.