'हर हर शंभू' फेम गायिकेचे वडील अन् भाऊ निघाले खूनी, हत्येच्या आरोपाखाली झाली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2023 07:14 PM2023-10-10T19:14:26+5:302023-10-10T19:14:48+5:30

गायिका फरमानी नाझ इंडियन आयडॉल हा शो मध्येही येऊन गेली आहे

Har Har Shambhu song fame singer Farmani Naaz father and brother turned out to be murderers got arrested | 'हर हर शंभू' फेम गायिकेचे वडील अन् भाऊ निघाले खूनी, हत्येच्या आरोपाखाली झाली अटक

'हर हर शंभू' फेम गायिकेचे वडील अन् भाऊ निघाले खूनी, हत्येच्या आरोपाखाली झाली अटक

Har Har Shambhu fame Farmani Naaz: तुम्हाला गायिका फरमानी नाझ आठवत असेलच. तिचे 'हर हर शंभू' हे शिवभजन खूप गाजले. 'इंडियन आयडॉल'मध्येही तिने नशीब आजमावले, पण मुलाच्या ऑपरेशनमुळे तिला शो मध्येच सोडावा लागला. आता एका वेगळ्या कारणाने ती पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मुझफ्फरनगर पोलिसांनी गायिकेच्या कुटुंबाबाबत एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिचा भाऊ आणि वडिलांसह अन्य 4 जणांना अटक करण्यात आली असून त्यांच्यावर चुलत भावाची हत्या केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी त्यांना आरोपी म्हणून घोषित केले आहे. याशिवाय हत्येदरम्यान वापरलेले दोन चाकू आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ही घटना 5 ऑगस्ट रोजी घडली. फरमानी नाजचा चुलत भाऊ खुर्शीद याच्यावर दुचाकीवरून आलेल्या तिघांनी हल्ला केला आणि त्याला जखमी करून ते पळून गेले. घरच्यांना कळताच त्यांनी त्याला रुग्णालयात नेले मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. आता या घटनेमागे फरमानीचाच भाऊ आणि वडील असल्याचा खुलासा पोलिसांनी केला आहे.

फरमानीचा भाऊ आणि वडिलांना अटक

या प्रकरणाचा सखोल तपास केल्यानंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेतला. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी त्यांनी अनेक पथकेही तयार केली होती. आता वडील आरिफ, भाऊ फरमान यांच्याशिवाय फरियाद आणि झाकीर नावाच्या व्यक्तीलाही अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून हत्येसाठी वापरलेली शस्त्रे आणि दुचाकी जप्त करण्यात आली आहेत.

Web Title: Har Har Shambhu song fame singer Farmani Naaz father and brother turned out to be murderers got arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.