"नोकरी करायची असेल तर कॉम्प्रोमाइझ कर, नाहीतर कोलकातासारखी..."; डॉक्टरची नर्सला धमकी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2025 14:30 IST2025-10-30T14:28:19+5:302025-10-30T14:30:52+5:30
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

"नोकरी करायची असेल तर कॉम्प्रोमाइझ कर, नाहीतर कोलकातासारखी..."; डॉक्टरची नर्सला धमकी
मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कंपू पोलीस स्टेशन परिसरात असलेल्या गजराजा मेडिकल कॉलेज (GMRC) च्या रुग्णालयात दोन डॉक्टरांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही डॉक्टरांनी एका नर्सला त्रास दिला. तसेच "जर नोकरी करायची असेल तर कॉम्प्रोमाइझ करावं लागेल, आम्हाला खूश ठेव" असंही म्हटलं.
नर्सने असा आरोप केला आहे की, डॉक्टरांनी तिला कोलकातासारखी घटना घडवू अशी धमकी दिली. कोलकाताच्या रुग्णालयात एका ज्युनियर डॉक्टरवर क्रूरपणे बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. हीच धमकी आता डॉक्टर नर्सला देत आहे. जयआरोग्य रुग्णालयातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचे अधीक्षक डॉ. गिरजा शंकर गुप्ता आणि नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. शिवम यादव यांच्यावर एका नर्सने हे गंभीर आरोप केले आहेत.
पोलीस तक्रारीत नर्सने म्हटलं आहे की, ती रात्री ११:३० वाजता डॉ. शिवम यादव यांच्या चेंबरमध्ये सरकारी कामासाठी गेली होती तेव्हा डॉ. शिवम यादव यांनी वाईट हेतूने तिचा हात धरला आणि कॉम्प्रोमाइझ करण्याची मागणी केली. डॉ. गिरजा शंकर यांना खूश ठेवावे लागेल असं सांगितलं. शंकर तुमचे वैद्यकीय अधीक्षक आहेत म्हणून तू ते जे काही म्हणतील ते कर असंही म्हटलं.
नर्सने डॉक्टरच्या तावडीतून कशी तरी तिची सुटका केली आणि बाहेर पळून गेली. त्यानंतर डॉक्टरने तिला जातीवाचक शिवीगाळ केली. "तुला जिथे पाहिजे तिथे तक्रार कर जा, कोणीही आमचं काही बिघडवू शकत नाही" असं म्हणत पुन्हा धमकी दिली. घाबरलेल्या नर्सने सर्वात आधी हा धक्कादायक प्रकार तिच्या पालकांना सांगितला, नंतर कंपू पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली.