मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जिल्ह्यातील घेंघोली गावातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका तरुणाने लव्ह मॅरेज केल्यामुळे संतापलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी तरुणाच्या मोठ्या भावाच्या घरावर थेट जेसीबी मशीन चालवून ते पाडून टाकलं. आरोपींच्या दहशतीमुळे पीडित कुटुंब तब्बल ५ महिने गावाबाहेर भटकत होतं. आता हे कुटुंब पुन्हा गावात परतल्यानंतर पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.
'लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर' कोण?... क्लिक करून आपलं मत नोंदवा!
घाटीगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घेंघोली येथील रहिवासी वनिया सिंह गुर्जर यांचा धाकटा भाऊ रामलखन याने सिरोली गावातील किरण गुर्जर हिच्याशी लव्ह मॅरेज केलं होतं. दोघेही सज्ञान होते आणि त्यांनी स्वतःच्या संमतीने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हे लग्न किरणचे वडील गिर्राज गुर्जर यांना मान्य नव्हतं. सामाजिक प्रतिष्ठेचा मुद्दा बनवत त्यांनी मुलाच्या कुटुंबाला धडा शिकवण्याचं ठरवलं.
एका रात्री गिर्राज गुर्जर आपले साथीदार भूपेंद्र, सिद्धार्थ आणि भारत यांच्यासह जेसीबी मशीन घेऊन वनिया सिंह यांच्या घराजवळ गेला. आरोपींनी शिवीगाळ करत जेसीबीच्या साहाय्याने वनिया सिंह यांच्या घराच्या तीन खोल्यांचं बांधकाम पूर्णपणे उद्ध्वस्त केलं.
या हल्ल्याच्या वेळी वनिया सिंह आणि त्यांच्या कुटुंबाने जीव वाचवण्यासाठी तिथून पळ काढला. आरोपी त्यांचा पाठलाग करत होते, त्यामुळे पीडित कुटुंब इतकं घाबरलं होतं की, त्यांची पोलिसांकडे जाण्याची हिंमत झाली नाही. घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, परंतु दहशतीमुळे पीडित कुटुंब समोर आलं नाही.
तब्बल पाच महिने इकडे-तिकडे भटकल्यानंतर जेव्हा हे कुटुंब पुन्हा गावात परतलं तेव्हा मंगळवारी घाटीगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी मुख्य आरोपी गिर्राज गुर्जर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.
ग्वाल्हेरचे CSP रॉबिन जैन यांनी दिलेल्या माहितीनुसार, "तपासात ही घटना सत्य असल्याचं आढळलं आहे. फिर्यादी पक्ष प्रचंड घाबरलेला होता, त्यामुळे तक्रार देण्यास उशीर झाला. आता गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरू आहे."
Web Summary : In Gwalior, a man's house was demolished by his daughter's father after his younger brother's love marriage. The family fled for five months out of fear. Police have registered a case and are investigating.
Web Summary : ग्वालियर में, एक व्यक्ति के छोटे भाई के प्रेम विवाह के बाद लड़की के पिता ने उसके भाई का घर तोड़ दिया। डर के मारे परिवार पांच महीने तक भागता रहा। पुलिस ने मामला दर्ज कर जांच शुरू कर दी है।