शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

तब्बल ४० लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने केला जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2021 8:15 PM

Food and Drug Administration action : या कंटेनरचा चालक अर्जुन भीमराव गोयेकर यास ताब्यात घेऊन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी माणिक जाधव यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .

ठळक मुद्देतब्बल ११ कोटी ८० लाख रुपयांचा गुटखा पकडून या विभागातील या व्यवसायात असलेल्या माफियांचे रॅकेट उध्वस्त करीत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाची कामगिरी केली असल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली आहे.  

नितिन पंडीतभिवंडीभिवंडी शहर व ग्रामीण भागातील पानपट्टीवर मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री केला जात असतानाच गुजरात येथून कंटेनरच्या माध्यमातून विक्रीसाठी आणलेला तब्बल ४० लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी जप्त केला आहे .अन्न व औषध प्रशासनाचे भिवंडी परिक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांना आपल्या बतमीदारा मार्फत गुजरातहुन वाडा मार्गे एक कंटेनर भिवंडी परिसरात गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न अधिकारी माणिक जाधव ,शंकर राठोड ,मनीष सानप,अरविंद खडके या पथकाने भिवंडी वाडा रस्त्यावर पाळत ठेवून कंटेनर हा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलार येथे आला असता त्या ठिकाणी या पथकाने त्यास अडवून कंटेनर मधील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये १०० गोणींमध्ये विमल गुटखा हा तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे आढळून आले . या कंटेनरचा चालक अर्जुन भीमराव गोयेकर यास ताब्यात घेऊन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी माणिक जाधव यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अन्न व औषध विभागाच्या भिवंडी परिक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑक्टोबर २०१९ पासून आजपर्यंत विविध ठिकाणी कारवाई करीत तब्बल ११ कोटी ८० लाख रुपयांचा गुटखा पकडून या विभागातील या व्यवसायात असलेल्या माफियांचे रॅकेट उध्वस्त करीत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाची कामगिरी केली असल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली आहे.  

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभागBhiwandiभिवंडी