नितिन पंडीतभिवंडी - भिवंडी शहर व ग्रामीण भागातील पानपट्टीवर मोठ्या प्रमाणावर गुटखा विक्री केला जात असतानाच गुजरात येथून कंटेनरच्या माध्यमातून विक्रीसाठी आणलेला तब्बल ४० लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी जप्त केला आहे .अन्न व औषध प्रशासनाचे भिवंडी परिक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांना आपल्या बतमीदारा मार्फत गुजरातहुन वाडा मार्गे एक कंटेनर भिवंडी परिसरात गुटखा घेऊन येत असल्याची माहिती मिळाल्यानंतर अन्न अधिकारी माणिक जाधव ,शंकर राठोड ,मनीष सानप,अरविंद खडके या पथकाने भिवंडी वाडा रस्त्यावर पाळत ठेवून कंटेनर हा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत शेलार येथे आला असता त्या ठिकाणी या पथकाने त्यास अडवून कंटेनर मधील मालाची तपासणी केली असता त्यामध्ये १०० गोणींमध्ये विमल गुटखा हा तंबाखूजन्य पदार्थ असल्याचे आढळून आले . या कंटेनरचा चालक अर्जुन भीमराव गोयेकर यास ताब्यात घेऊन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी माणिक जाधव यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .अन्न व औषध विभागाच्या भिवंडी परिक्षेत्राचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ऑक्टोबर २०१९ पासून आजपर्यंत विविध ठिकाणी कारवाई करीत तब्बल ११ कोटी ८० लाख रुपयांचा गुटखा पकडून या विभागातील या व्यवसायात असलेल्या माफियांचे रॅकेट उध्वस्त करीत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाची कामगिरी केली असल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली आहे.
तब्बल ४० लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने केला जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2021 20:15 IST
Food and Drug Administration action : या कंटेनरचा चालक अर्जुन भीमराव गोयेकर यास ताब्यात घेऊन भिवंडी तालुका पोलीस ठाण्यात अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी माणिक जाधव यांनी दिलेल्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे .
तब्बल ४० लाख रुपये किंमतीचा गुटखा अन्न व औषध प्रशासनाने केला जप्त
ठळक मुद्देतब्बल ११ कोटी ८० लाख रुपयांचा गुटखा पकडून या विभागातील या व्यवसायात असलेल्या माफियांचे रॅकेट उध्वस्त करीत महाराष्ट्रात अव्वल क्रमांकाची कामगिरी केली असल्याची माहिती पथकाकडून देण्यात आली आहे.