पिंपरी-चिंचवड : अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या कारवाई करत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालताना संशयितरित्या आढळलेल्या टेंपोचा पाठलाग करून तब्बल १३ लाख ४८ हजार चारशे रुपयांचा गुटखा जप्त केला . याप्रकरणी विक्रम पेशोराम भक्तीयारपुरी (वय २९, रा. वैभव नगर पिंपरी) या चालकाला अटक करण्यात आली असून त्याच्याकडील गुटखा व एमएच १२, एमव्ही १४६३ या क्रमांकाचा टेंपो हस्तगत करण्यात आला आहे. याबाबत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा पथकाकडून वाकड हद्दीत गुटखा विक्री करणाऱ्या गुन्हेगारांवर प्रतिबंध घालण्यासाठी गस्त सुरू असताना एक संशयितरित्या आढळून आला. त्याचा पाठलाग करून झडती घेतली असता त्यात गुटखा आढळून आल्याने अन्न व भेसळ निरीक्षकांना बोलावुन घेत गुन्हा दाखल करण्यात आला. टेंपोत तब्बल १३ लाख ४८ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला.
वाकड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला साडे तेरा लाखांचा गुटखा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 19:11 IST
अमली पदार्थ विरोधी पथक, गुन्हे शाखा यांनी संयुक्तरित्या कारवाई करत वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालताना संशयितरित्या आढळलेल्या टेंपोचा पाठलाग करून तब्बल १३ लाख ४८ हजार चारशे रुपयांचा गुटखा जप्त केला.
वाकड येथे अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केला साडे तेरा लाखांचा गुटखा
ठळक मुद्देटेंपोतील तब्बल १३ लाख ४८ हजार ४०० रुपये किमतीचा गुटखा जप्त