बायकोची हत्या, मृतदेहाचे तुकडे अन् प्रेशर कुकरचा वापर..; पोलीस अधिकारीही हादरले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2025 17:22 IST2025-01-25T17:22:21+5:302025-01-25T17:22:49+5:30

४५ वर्षीय गुरूमूर्ती आधी लष्कारात जवान म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते निवृत्त झाले आणि हैदराबाद इथं पत्नी मुलांसह सेटल झाले. 

Gurumurthy, an ex-Armyman, allegedly claimed to have killed his wife in a fit of rage after an argument | बायकोची हत्या, मृतदेहाचे तुकडे अन् प्रेशर कुकरचा वापर..; पोलीस अधिकारीही हादरले

बायकोची हत्या, मृतदेहाचे तुकडे अन् प्रेशर कुकरचा वापर..; पोलीस अधिकारीही हादरले

हैदराबाद - एक निवृत्ती जवान बायकोचा खून करतो, मात्र हत्येनंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावायची असा प्रश्न त्याला पडतो. यातूनच त्याच्या डोक्यात भयानक कल्पना सुचते. तो पत्नीच्या मृतदेहाचे छोटे छोटे तुकडे करतो. त्यानंतर एका पाठोपाठ एक हे तुकडे घरातील किचनमध्ये प्रेशर कुकरमध्ये उकळतो. पुढील ७२ तास ते तसेच ठेवतो. त्यानंतर हे तुकडे जवळच्याच एका तलावात फेकतो. यानंतरची कहाणी त्याहून अधिक भयंकर आहे जी सर्वांनाच हैराण करेल.

शहरातील मीरपेट परिसरात घडलेल्या या घटनेने खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे, ते घर ज्याच्या किचनमध्ये ठेवलेला प्रेशर कुकर पाहून काही दिवसांपूर्वी त्यात मानवी शरीराचे तुकडे उकळवले गेले याची कल्पनाही कुणी करू शकत नाही. दिल्लीच्या श्रद्धा वाल्कर आणि मुंबईच्या सरस्वती हत्या प्रकरणाची आठवण या घटनेने पुन्हा ताजी झाली. १६ जानेवारीला या घरात राहणारी पी वेंकटा माधवी अचानक गायब झाली. मूळची आंध्र प्रदेशातील नांदयाल येथील माधवीचं लग्न १३ वर्षापूर्वी गुरूमूर्तीसोबत झालं होते. ४५ वर्षीय गुरूमूर्ती आधी लष्कारात जवान म्हणून कार्यरत होते. त्यानंतर ते निवृत्त झाले आणि हैदराबाद इथं पत्नी मुलांसह सेटल झाले. 

DRDO इथं सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी

गुरूमूर्ती सध्या DRDO येथे सिक्युरिटी गार्ड म्हणून नोकरी करतात. माधवी आणि गुरूमूर्ती यांना २ मुले आहेत. या जोडप्याचे आयुष्य आनंदी होते परंतु सर्वकाही ठीक असताना अचानक माधवी तिच्या घरातून गायब झाली. माधवी नेहमी तिच्या आई वडिलांशी बोलत होती, परंतु १६ जानेवारीपासून तिचा मोबाइलही स्विच ऑफ आहे.  मुलगी गायब झाल्याने तिचे आई वडील चिंतेत पडतात. जावई गुरूमूर्तीला ते विचारणा करतात परंतु माझं आणि तिचं भांडण झाले त्यानंतर ती घरातून निघून गेली असं त्याने सांगितले. अखेर २ दिवसांनी १८ जानेवारीला माधवीचे आई वडील हैदराबादच्या व्यंकटेश्वरा नगर कॉलनीत पोहचतात. 

पोलीस स्टेशनला केली तक्रार

मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना द्यायची असा निर्णय आई वडील घेतात. हैदराबादला जाण्यापूर्वी त्यांनी जावयाशी चर्चा केली त्यानंतर तिघांनी मिळून माधवी गायब झाल्याची तक्रार द्यायला पोलीस स्टेशनला पोहचले. माधवीचे आई वडील आणि पती एकत्रित आले, परंतु अखेरचं माधवीला कुणी पाहिले तर ते पती गुरूमूर्तीने, कारण माधवी घरातूनच गायब झाली होती. त्यामुळे पोलिसांचा गुरूमूर्तीवर संशय गेला. मकर संक्राती सणासाठी माधवीला माहेरी जायचं होते. परंतु गुरूमूर्ती तिला पाठवायला तयार नव्हता. त्यावरूनच दोघांचे भांडण झाले आणि माधवीने रागाच्या भरात घर सोडले असं पतीने पोलिसांना सांगितले.

..म्हणून पोलिसांना आली शंका

पत्नीने घर सोडल्यानंतर पतीने तिच्या घरच्यांना कळवलं नाही, स्वत:ही २ दिवसांपर्यंत तिला शोधण्याचा प्रयत्न केला नाही त्यामुळे पोलीस हैराण होती. माधवी बेपत्ता प्रकरणी पतीची चौकशी करायची असं पोलिसांनी ठरवले. त्यानंतर चौकशी सुरू झाली तेव्हा गुरूमूर्तीचा जबाब ऐकून पोलिसांना सगळेच सत्य कळाले. पत्नीची हत्या करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची कबुली गुरूमूर्तीने पोलिसांना दिली. १६ जानेवारीला भांडणात मी तिला मारून टाकले, त्यावेळी घरात दोन्ही मुले नव्हती. मात्र सगळे पुरावे, मृतदेहाची विल्हेवाट लावल्यामुळे पोलिसांना याचा तपास करणे आव्हानात्मक बनलं आहे.
 

Web Title: Gurumurthy, an ex-Armyman, allegedly claimed to have killed his wife in a fit of rage after an argument

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.