रेप केला, तुरूंगात जाण्यापासून वाचण्यासाठी लग्न केलं अन् मग दिला घटस्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2023 15:31 IST2023-02-23T15:30:34+5:302023-02-23T15:31:00+5:30
Crime News : पीडितेने सांगितलं की, हे प्रकरण सोडवण्यासाठी जेव्हा माझ्या घरचे लोक पंचायतला घेऊन समीरच्या घरी गेले तेव्हा त्याने तीन तलाक दिला. इतकंच नाही तर त्याने मला पत्राद्वारेही तीन तलाक दिला.

रेप केला, तुरूंगात जाण्यापासून वाचण्यासाठी लग्न केलं अन् मग दिला घटस्फोट
Crime News : दिल्लीच्या जवळ गुरूग्राममध्ये पोलिसांनी बुधवारी सांगितलं की, इथे एका 28 वर्षीय एका महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल केली आहे. ज्याने कथितपणे तिच्यासोबत बलात्कार केला आणि मग आरोपातून वाचण्यासाठी तिच्यासोबत लग्न केलं. त्यानंतर लगेच तिला तीन तलाक दिला.
महिलेने आरोप केला आहे की, समीर अहमद नावाच्या व्यक्तीने पंचायतमध्ये तीन वेळा तलाक म्हटल्यानंतर पत्रांच्या माध्यमातून तिला तलाक दिला होता. महिलेने आपल्या तक्रारीत सांगितलं की, आरोपी पुन्हानाचा राहणारा आहे. समीर अहमदने माझ्यासोबत 2020 मध्ये शारीरिक संबंध ठेवले होते. जेव्हा मी परिवाराला सांगितलं. तेव्हा ते त्याच्यासोबत बोलले आणि तो माझ्यासोबत लग्न करण्यास तयार झाला. 29 मे 2020 रोजी मुस्लिम रिती-रिवाजाने आमचा निकाह झाला. पण तो मला कधीही घरी घेऊन गेला नाही'.
पीडितेने सांगितलं की, हे प्रकरण सोडवण्यासाठी जेव्हा माझ्या घरचे लोक पंचायतला घेऊन समीरच्या घरी गेले तेव्हा त्याने तीन तलाक दिला. इतकंच नाही तर त्याने मला पत्राद्वारेही तीन तलाक दिला.
आता अहमद आणि त्याच्या परिवाराविरोधात मंगळावारी महिलेने गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी सांगितलं गुन्हा दाखल करून घेतला आहे, पुढील कारवाई लवकरच केली जाईल.