केस विंचरून टक्कल लपवलं, गरोदर असताना मारहाण; गुजरातमधील महिलेचा सासरच्यांवर छळाचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 20:06 IST2025-09-09T20:05:38+5:302025-09-09T20:06:24+5:30
गुजरातमध्ये महिलेने पती आणि तिच्या सासरच्यांविरुद्ध घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला,

केस विंचरून टक्कल लपवलं, गरोदर असताना मारहाण; गुजरातमधील महिलेचा सासरच्यांवर छळाचा आरोप
Gujarat Domestic Violence Case: गुजरातमध्येघरगुती हिंसाचाराला कंटाळून एका महिलेने तिच्या कुटुंबिविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. २०१९ मध्ये एका मॅट्रिमोनियल साईटवर परिपूर्ण जोडीदाराच्या रूपात महिलेची पतीसोबत ओळख झाली होती. पण सहा वर्षांनी, अहमदाबादमधील एका ३३ वर्षीय महिलेने तिच्या पती आणि सासरच्या लोकांविरुद्ध महिला पोलीस ठाण्यामध्ये घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केला.
धक्कादायक बाब म्हणजे महिलेने शारीरिक अत्याचार आणि छळाच्या आरोपांसोबत तक्रारीत फसवणुकीचाही आरोप केला. लग्नाच्या एका महिन्यात, महिलेला कळलं की तिच्या पतीने कुशलतेने केस विंचरून त्याचे टक्कल लपवले होते. हे जोडपे २०१९ मध्ये एका मॅट्रिमोनियल साईटवर भेटले आणि अमेरिकेत जाण्यापूर्वी फेब्रुवारी २०२० मध्ये त्यांनी लग्न केले होते.
तक्रारीनुसार, पतीला आणि सासरच्यांनी महिलेच्या आई वडिलांनी हुंडा म्हणून दिलेले १४० ग्रॅम सोने पुरेसे नसल्याचे सांगत छळ सुरु केला होता.
सुरुवातीचा वैवाहिक आनंद लवकरच नाहीसा झाला. यावरुनच त्यांनी महिलेला शिवीगाळ आणि मारहाण केली. एफआयआरमध्ये महिलेने आरोप केला पतीने विमान भाड्याचा खर्च परत करण्याचे आश्वासन दिले होते पण ते कधीही दिले नाही.
लग्नाच्या एका महिन्यानंतर, महिलेला आढळले की तिचा नवरा त्याचे टक्कल केसांवर कंघवा विंचरून लपवत होता. लग्नानंतरही त्याने ही गोष्ट पत्नीपासून लपवून ठेवली होती. २०२० मध्ये ते टेक्सासला गेल्यानंतर त्यांच्या लग्नात आणखी कटुता आली. पती वारंवार रागावत असे. २०२२ मध्ये आरोपीने गरोदरपणात महिलेला मारहाण केली आणि भांडणात तिला बेडवर ढकलून दिले. २०२३ मध्ये बाळाच्या जन्मानंतर अन्न, औषधे आणि वैद्यकीय मदत केली नाही असाही आरोप महिलेने केला.
दुसरीकडे, सासरच्या लोकांनीही तक्रारदाराच्या भावाला अमेरिकेत त्यांच्या घरी राहण्यापासून रोखले. तसेच महिलेच्या नवजात बाळाला सांभाळण्यासाठी आलेल्या तिच्या आईचाही अपमान केला. फेब्रुवारी २०२५ मध्ये जेव्हा ती तिच्या बहिणीच्या लग्नासाठी अहमदाबादला आली तेव्हा तणाव वाढला. कुटुंबातील सदस्यांनी वारंवार समेट करण्याचा प्रयत्न करूनही, हा वाद सुटला नाही. त्यामुळे सोमवारी, महिलेने औपचारिक तक्रार दाखल केली. पोलिसांनी तिच्या पती आणि सासरच्या लोकांवर घरगुती हिंसाचार आणि मारहाणीशी संबंधित कलमांसह हुंडा प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींखाली गुन्हा दाखल केला आहे.