हुंड्यात फॉर्च्युनरच हवी म्हणून नवऱ्याने घातली गळ; PhD पास वधू राहिली बसून

By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2021 09:00 PM2021-12-07T21:00:05+5:302021-12-07T21:42:40+5:30

Dowry Case : घटनास्थळी मुलीच्या बाजूच्या लोकांनी जाब विचारला असता रात्री २/३ वाजेपर्यंत वारंवार बोलावून देखील वरपक्ष फेरे मारण्यास आले नसल्याचे सांगितले. पोलिसांना पाहून फेऱ्या मारताय, नंतर काहीही करू शकता.

The groom stopped the marriage on the demand of the fortuner in dowry in karnal, haryana | हुंड्यात फॉर्च्युनरच हवी म्हणून नवऱ्याने घातली गळ; PhD पास वधू राहिली बसून

हुंड्यात फॉर्च्युनरच हवी म्हणून नवऱ्याने घातली गळ; PhD पास वधू राहिली बसून

googlenewsNext

करनाल - हरियाणातील करनाल जिल्ह्यात पीएचडी पास वधूचे सातफेरे पैशाची आणि फॉर्च्युनर कारची मागणी पूर्ण न झाल्यामुळे थांबले. रात्रभर वधू लग्नातील सात फेऱ्यांची वाट पाहत बसली होती. सकाळी पोलिसांना पाचारण करण्यात आले. सकाळी आठ वाजता पोलिसांसमोर फेऱ्या मारण्यासाठी वर तयार झाला. घटनास्थळी मुलीच्या बाजूच्या लोकांनी जाब विचारला असता रात्री २/३ वाजेपर्यंत वारंवार बोलावून देखील वरपक्ष फेरे मारण्यास आले नसल्याचे सांगितले. पोलिसांना पाहून फेऱ्या मारताय, नंतर काहीही करू शकता.

जिंद येथील नसीब हे कृषी विभागात सरकारी नोकरीत आहेत. ज्या मुलीसोबत त्याचे लग्न झाले होते तीही शिक्षण विभागात कार्यरत आहे. दोघेही सरकारी नोकरीवर आहेत. कोमलचे वडील एनडीआरआयमध्ये कार्यरत आहेत. त्यांनी पालनपोषण करून आपल्या मुलीचे संगोपन केले आहे. संगोपन, शिक्षण देऊन मोठं केल्यानंतर आता करनालमध्ये तिचे  लग्न होणार होते. मुळात मुलीचे लोक यूपीचे आहेत. जेव्हा संबंध जुळले तेव्हा कोणत्याही प्रकारची मागणी करण्यात आली नाही, असा आरोप आहे.

मुलीच्या वडिलांनी सांगितले की, वरात आल्यानंतर विवाह सोहळा होतो. मुलीच्या वडिलांनी वराचे वडील यांना अंगठी आणि वराला सोनसाखळी घातली. ही लग्नातील चालीरीती आटोपल्यानंतर वर तेथून उठला आणि लगेचचगळ्यातील साखळी ओढून फेकून दिली. आम्ही त्याला हात जोडून विनंती करू लागलो तेव्हा कळलं की त्या मुलाच्या नातेवाईकाला आणि दुसऱ्या भावाची सोनसाखळीही हवी होती. आम्ही दोन दिवसाचा अवधी मागितला.नकार देत त्याने शिवीगाळ करत सातफेरे घेण्यास नकार दिला. 20 लाख आणि फॉर्च्युनर कारची मागणी करण्यात आली. आम्ही वराला बोलवत राहिलो आणि तो आम्हाला टाळत राहिला. माझी मुलगी LLB, LLM, Ph.D आहे. ती नोकरी करते. एखाद्याच्या मुलीला असे सोडून गेल्यावर बापाने काय करावे?

मंगळवारी सकाळपर्यंत नकार सुरूच होता. वरपक्षाची ही वागणूक न पटल्याने वधूपक्षाने पोलिसांना पाचारण करण्यात आले. मुलीच्या आईने सांगितले की, तिने मुलाकडच्या लोकांचे पाय पकडले. ते मान्य करायला कोणी तयार नव्हते. जावई गाडीची मागणी करत होता. वराचा भावोजी दिल्ली पोलिसात काम करतो. तो येत आहे आणि म्हणत आहे की, तू फॉर्च्युनर मागितली आहेस तर तू आता मागे का फिरतो आहेस.


पोलिसांनी सांगितले की, माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेतले आहे. त्यांच्याकडे कार, पैसे आणि दागिन्यांची मागणी केल्याचा आरोप वधू पक्ष करत आहेत. त्याचवेळी मुलाने हुंडा घेण्यास नकार दिल्याचे सांगितले. त्याने सोनसाखळी काढली आणि १० दिवसांनी देण्यास सांगितले. त्यांच्या घरात भांडण होणार नाही. यावरून त्यांच्यात भांडण सुरु झाले. कुटुंबीयांनी तक्रार केल्यास चौकशी केली जाईल.

Web Title: The groom stopped the marriage on the demand of the fortuner in dowry in karnal, haryana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.