VIDEO: दिव्यांग तरुण जीवाच्या आकांतानं ओरडत होता; पती-पत्नी बांबू, काठीनं मारत राहिले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 12:46 IST2022-03-29T12:43:38+5:302022-03-29T12:46:59+5:30

दिव्यांग तरुणाला पती पत्नीकडून बेदम मारहाण; स्कूटरचंही नुकसान

grater noida viral video disabled disabled youth beaten by his relatives | VIDEO: दिव्यांग तरुण जीवाच्या आकांतानं ओरडत होता; पती-पत्नी बांबू, काठीनं मारत राहिले

VIDEO: दिव्यांग तरुण जीवाच्या आकांतानं ओरडत होता; पती-पत्नी बांबू, काठीनं मारत राहिले

नोएडा: उत्तर प्रदेशच्या ग्रेटर नोएडामध्ये एका दिव्यांग तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. तरुणाला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण करणारे पती, पत्नी दिव्यांग तरुणाचेच नातेवाईक आहेत. घटनेनंतर दिव्यांग गजेंद्रनं पोलीस ठाण्यात तक्रार दिली. या प्रकरणी आरोपी जुगेंद्र आणि त्याच्या पत्नीला अटक करण्यात आली.

व्हायरल झालेला व्हिडीओ २७ मार्चचा आहे. यामध्ये दिव्यांग तरुण गजेंद्रला त्याचेच नातेवाईक मारताना दिसत आहेत. आरोपी जोगेंद्रनं त्याच्या मालकीची शाळा गजेंद्रला चालवण्यास दिली होती. मात्र लॉकडाऊनमुळे दोन वर्षे ती बंद राहिली. त्यामुळे गजेंद्रनं शाळा भाडेतत्त्वावर दिली. त्यावरूनच गजेंद्र आणि जुगेंद्र यांच्यात वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की संतापलेल्या जुगेंद्रनं पत्नीसह गजेंद्रला मारहाण केली. 

जुगेंद्र आणि त्याच्या पत्नीनं बांबू आणि काठीनं गजेंद्रवर हल्ला चढवला. त्याच्या दुचाकीचंही नुकसान केलं. याची तक्रार गजेंद्रनं पोलिसांकडे केली. यानंतर आरोपी पती-पत्नीला अटक करण्यात आली. दोघांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. पती-पत्नीनं गजेंद्रला केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Web Title: grater noida viral video disabled disabled youth beaten by his relatives