शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

हा तर आत्महत्येचा स्टंट; पाणी अंगावर ओतून घेऊन ती करत होती आत्मदहन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2018 16:55 IST

बीड जिल्ह्यातील पाली येथे राहणाऱ्या राधाबाई साळुंखे (वय - ७०) यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन दिले सोडून 

मुंबई -  मंत्रालयासमोर आजवर रॉकेल ओतून, विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आला आहे. पण आज एका आजीने चक्क पाणी अंगावर ओतून घेत  आत्मदहनाचा प्रयत्न केल्याची घटना सकाळी घडली. राधाबाई साळुंखे (वय - ७०) असे या वृद्ध महिलेचे नाव असून पोलिसांनी तिला ताब्यात घेतले होते. आता त्या त्यांच्या गावाकडे जाण्यास निघाल्या असल्याची माहिती मारिन ड्राईव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विलास गंगावणे यांनी दिली. 

बीड तालुक्यातील पाली येथे राहणाऱ्या राधाबाई साळुंखे यांनी आज सकाळी मंत्रालयसमोर स्वतःवर पाणी ओतून आत्मदहनाचा प्रयत्न करत ड्रामा केला आणि संबंध सुरक्षा यंत्रणा हादरून सोडल्या. जमिनीचा निकाल विरोधात लागल्याने साळुंखे यांनी पाण्याची बॉटल अंगावर ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला अशी माहिती गंगावणे यांनी दिली. साळुंखे यांना मंत्रालयातील सुरक्षा विभागने तातडीने ताब्यात घेतले आणि मारिन ड्राईव्ह पोलिसांच्या आजींना सुपूर्द करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी आजींची सुटका केली. बीड तालुक्यातील पाली येथील रहिवासी राधाबाई कुंडलिक साळुंके यांचा गावातीलच नवनाथ साहेबा साळुंके यांच्याशी जमिनीसंदर्भात वाद सुरु होता. राधाबाई साळुंके यांनी ६ फेब्रुवारी २०१८ रोजी जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख बीड यांच्याकडे या जमिनीसंदर्भात अर्ज दाखल केला होता. त्यांच्या जागेमध्ये पाणीपुरवठा विभागाने रस्ता व कार्यालय बांधले असून या कामी कोणतेही भूसंपादन झालेले नाही. तसेच भूसंपादन मावेजाही मिळालेला नाही. मात्र, प्रत्यक्षात साहेबा गेना साळुंके यांची ३४ गुंठे जागा संपादित झालेली असून, त्यांनी मावेजा घेतला आहे. जागा परत नावावर करण्याची विनंती राधाबाई साळुंके यांनी या अर्जात केली होती. याप्रकरणी भूमि अभिलेख कार्यालयाने तिच्या बाजूने निकाल दिला होता. तसेच १० गुंठे जमीन देण्याचे आदेश दिले होते. भूमि अभिलेखच्या या आदेशाविरुद्ध नवनाथ साळुंके यांनी महसूल राज्यमंत्री यांच्याकडे अपील केले होते. हे अपील राज्यमंत्र्यांनी मान्य केले. सुनावणी होऊन २५ जुलै २०१८ रोजी राधाबाई या आजींच्या विरोधात निकाल देण्यात आला होता. राज्यमंत्र्यांनी जमिनीसंदर्भात आपल्याविरुद्ध निकाल दिला म्हणून राधाबाई साळुंके यांनी मुंबईत आत्मदहन करण्याचा ड्रामा केला.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईSuicideआत्महत्याMantralayaमंत्रालयPoliceपोलिसMaharashtraमहाराष्ट्रBeedबीड