पूनम पांडेला केसाला धरून डोकं भिंतीवर आपटून केली मारहाण; पोलीस ठाण्यात तक्रार
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2021 20:59 IST2021-11-08T20:58:34+5:302021-11-08T20:59:18+5:30
Poonam Pandey : सॅमची पहिली पत्नी अलविरा हिच्याशी बोलत असल्याचा राग मनात धरून सॅमने मारहाण केल्याचा आरोप पूनम पांडे हिने तक्रारीत केला आहे.

पूनम पांडेला केसाला धरून डोकं भिंतीवर आपटून केली मारहाण; पोलीस ठाण्यात तक्रार
मुंबई - अभिनेत्री पूनम पांडेने पती सॅम अहमद बॉम्बे विरोधात वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सॅमची पहिली पत्नी अलविरा हिच्याशी बोलत असल्याचा राग मनात धरून सॅमने मारहाण केल्याचा आरोप पूनम पांडे हिने तक्रारीत केला आहे.
सॅमने पूनमच्या केसाला धरून तिचं डोकं भिंतीवर आपटलं आणि तिच्या चेहऱ्यावर ठोसा मारल्याने डाव्या डोळ्याला गंभीर जखम झाल्याने कमी दिसू लागल्याची तक्रार पूनमने पोलिसांना केली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलिसात तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांनी सॅम बॉम्बे याला अटक देखील करण्यात आली आहे. या प्रकरणी वांद्रे पोलीस अधिक तपास करत आहेत.