शहरं
Join us  
Trending Stories
1
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं
2
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला किती मिळणार? देवेंद्र फडणवीसांनी सांगितला आकडा
3
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
4
Israel Hamas War : इस्रायली लष्कराचा पॅलेस्टिनी नागरिकांना अल्टिमेटम, मोठ्या हल्ल्याची भीती
5
भाजपाचे २५-३० आमदार फोडण्याचं उद्धव ठाकरेंचं प्लॅनिंग झालं होतं; एकनाथ शिंदेंचा नवा दावा
6
Income Tax Return : आयटीआर फाईल करण्यासाठी का आवश्यक आहे Form 16? नसेल तर काय करू शकता?
7
Kangana Ranaut : "निवडणूक जिंकली तर..."; बॉलिवूड क्वीन कंगना राणौतची फिल्मी करिअरबाबत मोठी घोषणा
8
Rahul Gandhi : "संविधान बदलण्यासाठी 400 जागांचा नारा पण 150 जागाही मिळणार नाहीत"; राहुल गांधींचं टीकास्त्र
9
आम्हाला धोनी आपल्या संघात हवाय? चाहत्याची मागणी; पंजाबची मालकीण प्रीतीचं भारी उत्तर
10
पराभवाच्या भीतीने नरेंद्र मोदींच्या तोंडी हिंदू-मुस्लीम आणि पाकिस्तानची भाषा, काँग्रेसचं टीकास्र
11
बारामतीत गुंडांकडून प्रचार, रोहित पवार आणि अमोल मिटकरी आमने-सामने, गंभीर आरोप प्रत्यारोप
12
Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रातील खासदारांचं प्रगतीपुस्तक; लोकसभेत कशी राहिली कामगिरी?
13
रोकड पाहून अधिकारी चक्रावले; ED च्या छापेमारीवर काँग्रेस नेते आलमगीर यांची पहिली प्रतक्रिया
14
एकेकाळी वेटर म्हणून काम केलं; आता अंबानी-अदानी-मस्क-झुकरबर्ग यांनाही मागे टाकलं...
15
राज ठाकरेंच्या नावाचा विचार करावा, आनंद दिघेंच्या 'त्या' विधानानंतर काय घडलं?; CM शिंदेंचा गौप्यस्फोट
16
“पंतप्रधान मोदींना यावे लागते, महाराष्ट्रातील पराभव महायुतीला स्पष्ट दिसतो आहे”: अमोल कोल्हे
17
Acharya Pramod Krishnam : "जो PM मोदींसोबत नाही, तो देशद्रोही", आचार्य प्रमोद कृष्णम यांच्या विधानावरून वाद
18
व्हॉट्सॲपच्या एका फिचरवरुन सरकारसोबत वाद, भारतात WhatsApp बंद होणार?
19
एका दिवसात ₹११७० कोटींनी कमी झाली Rekha Jhunjhunwala यांची संपत्ती, टाटाचा 'हा' शेअर आपटला
20
“RSS-हेमंत करकरे यांच्यात संघर्ष, संघाचे लोक माझ्याकडे यायचे अन्...”; राऊतांचा मोठा दावा

पाच तासांमध्ये दोन कोटींची रोकड हस्तगत

By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2020 6:04 AM

ठाणे गुन्हे शाखेची कारवाई : फसवणूक करणाऱ्या दोघांना खंडवा येथून घेतले ताब्यात

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : अंधेरीतील व्यापाºयाला सुमारे सहा कोटींची कर्जाऊ रक्कम देण्याच्या नावाखाली सुरक्षा अनामत म्हणून दोन कोटींची रक्कम घेऊन मध्य प्रदेशात पसार झालेल्या विनोदकुमार झा (४८) आणि अमितकुमार यादव (२६, रा. दोघेही दरबंगा, बिहार) या दोघांनाही खंडवा येथून ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या युनिट-१ च्या पथकाने गुरुवारी ताब्यात घेतल्यानंतर त्यांना शुक्रवारी अटक केली आहे.

मुंबईतील मालाड येथील रहिवासी अक्षय परवडी यांनी ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाकडे यासंदर्भात १२ फेब्रुवारी रोजी तक्रार दिली होती. विनोदकुमार झा याने सहा कोटींचे कर्ज देण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून बँकेत सुरक्षा अनामत ठेवण्यासाठी दोन कोटींची रक्कम घेतली. ती बँकेत भरणा करण्याचा बहाणा करून आरटीजीएसची पावती आणून देतो, असे सांगून त्यांच्याकडून दोन कोटींची रक्कम घेऊन ती अमितकुमारकडे दिली. त्यानंतर, ठाणे रेल्वेस्थानकातून दोघेही पसार झाले. याप्रकरणी परवडी यांनी ठाणेनगर पोलीस ठाण्यात १३ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला. हे दोघेही ठाणे रेल्वेस्थानकातून पवन एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातून बिहारच्या दिशेने प्रवास करीत असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने काढली. फसवणुकीची माहिती १२ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ५ वाजता मिळाल्यानंतर तातडीने सीसीटीव्ही, तांत्रिक विश्लेषण आणि खबऱ्यांकडून मिळालेली माहिती खंडवा रेल्वे पोलिसांना ठाणे पोलिसांनी दिली. त्यानुसार, ही पवन एक्स्प्रेस खंडवा रेल्वेस्थानकात रात्री १० वाजता येताच म्हणजे अवघ्या पाच तासांमध्येच या दोघांनाही रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी दोन कोटींच्या रोकडसहित पकडले. या दोघांनाही १३ फेब्रुवारी रोजी ताब्यात घेतल्यानंतर ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय सरक यांच्या पथकाने १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता त्यांना अटक केली. त्यांना २० फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश ठाणे न्यायालयाने दिले आहेत.

करोडपती होण्याचे होते मनसुबेविनोदकुमार झा आणि त्याचा साथीदार अमित हे दोघेही पाच तासांसाठी करोडपती झाले होते. तोपर्यंत या पैशांमध्ये कायकाय करायचे, याचे त्यांनी अनेक मनसुबे आखले होते. परंतु, खंडवा रेल्वेस्थानकात रेल्वे थांबल्यानंतर त्यांचे सर्व मनसुबे धुळीला मिळाले.

गुन्हा दाखल होण्यापूर्वीच आरोपी जेरबंदया फसवणुकीची तक्रार १२ फेब्रुवारी रोजी ठाणे गुन्हे शाखेकडे आली. याची तत्काळ दखल घेऊन पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी सूत्रे हलविली. विशेष म्हणजे या फसवणुकीची तक्रार आरोपींच्या अटकेनंतर १३ फेब्रुवारी रोजी ठाणेनगर पोलीस ठाण्यात दाखल झाली.

टॅग्स :Policeपोलिस