खळबळजनक! गोवंडीत जागेच्या वादातून गोवंडीत गोळीबार
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 16:43 IST2019-05-27T16:41:07+5:302019-05-27T16:43:16+5:30
या प्रकरणी देवनार पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.

खळबळजनक! गोवंडीत जागेच्या वादातून गोवंडीत गोळीबार
मुंबई - भरदिवसा आज पहाटे ५ वाजताच्या सुमारास जागेच्या वादातून गोवंडी येथे बैंगण वाडी जंक्शन येथे अनोळखी सहा व्यक्तींनी मोटारसायकलवरून जात असताना तिघांवर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. या गोळीबारीत अब्बास शेख(२५), जुबेर (२२) आणि अरमान (१८) हे मोटारसायकलवरून जात असताना हा गोळीबार करण्यात आला. या गोळीबारीत अब्बाजच्या पायाला गोळी लागली असून मिर्झाही किरकोळ जखमी झाला आहे. या दोघांना उपचारासाठी पोलिसांनी शताब्दी रुग्णालयात दाखल केलं आहे. या प्रकरणी देवनार पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे.
त्याचप्रमाणे अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे. घाटकोपर मानखुर्द रोडच्या झाकीर हुसेन नगर परिसरातील लालूभाई कंपाऊडमध्ये सुलतान मिर्झा त्याच्या कुटुंबियांसोबत राहत होता. मिर्झाचे आरोपी राजन आणि जुनेदसोबत खालापूरच्या जमिनीवरून वाद सुरू होते. याच वादातून दोघांनी सुलतानचा काटा काढण्याचं ठरवलं. सोमवारी सुलतानच्या घरी तो त्याचे मित्र अरमान, जुबेर, अब्बास हे पहाटे ४ च्या सुमारात जमले होते. त्यावेळी ऑटो रिक्षा आणि स्कूटीवरून आलेल्या राजन आणि जुनेदने मिर्झावर गोळीबार करत पळ काढला. या प्रकरणी देवनार पोलिसांनी गुन्हा नोंदवून एका संशयिताला ताब्यात घेतलं आहे आणि इतर फरार आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती देवनार पोलिसांनी दिली.
मुंबई - गोवंडीत संपत्तीच्या वादातून गोवंडीत गोळीबार, दोन जखमी https://t.co/fUWIufFuiq
— Lokmat (@MiLOKMAT) May 27, 2019