मुंबई विमानतळावर परदेशी नागरिकांकडून १९ लाख रुपयांचे सोने जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2018 09:36 PM2018-11-22T21:36:40+5:302018-11-22T21:40:12+5:30

क्रांती नाथ पुलुमती (ब्रिटीश नागरिक) व परिणीता इरुकुल्ला हे प्रवासी लंडन येथून मुंबईत आले होते.  मुंबईहून जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यु ३९१ या विमानाने हैद्राबाद येथे जाण्याच्या तयारीत होते.

Gold worth Rs.19 lakh seized from foreign nationals in Mumbai airport | मुंबई विमानतळावर परदेशी नागरिकांकडून १९ लाख रुपयांचे सोने जप्त

मुंबई विमानतळावर परदेशी नागरिकांकडून १९ लाख रुपयांचे सोने जप्त

Next
ठळक मुद्देमुंबईहून हैद्राबादकडे जाणाऱ्या दोन प्रवाशांकडून १९ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहेक्रांती नाथ पुलुमती (ब्रिटीश नागरिक) व परिणीता इरुकुल्ला हे प्रवासी लंडन येथून मुंबईत आले होते. दोघांकडे एकूण ३ सोन्याची नाणी सापडली. सुमारे ६०० ग्रॅम वजनाचे हे सोने दोघांकडून जप्त करण्यात आले

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल २ वरुन मुंबईहून हैद्राबादकडे जाणाऱ्या दोन प्रवाशांकडून १९ लाख रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. बुधवारी सकाळी साडेनऊ वाजता ही कारवाई करण्यात आली. 

क्रांती नाथ पुलुमती (ब्रिटीश नागरिक) व परिणीता इरुकुल्ला हे प्रवासी लंडन येथून मुंबईत आले होते.  मुंबईहून जेट एअरवेजच्या ९ डब्ल्यु ३९१ या विमानाने हैद्राबाद येथे जाण्याच्या तयारीत होते. उड्डाणापूर्वी केल्या जाणाऱ्या तपासणीमध्ये या दोघांकडे एकूण ३ सोन्याची नाणी सापडली. सुमारे ६०० ग्रॅम वजनाचे हे सोने दोघांकडून जप्त करण्यात आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत सुमारे १९ लाख रुपये आहे. सीआयएसएफच्या जवानांनी याबाबत त्वरित आपल्या वरिष्ठांना माहिती दिली व सीमाशुल्क विभागाच्या एआययु विभागाला कळवण्यात आले. आरोपी व मुद्देमाल सीमाशुल्क विभागाकडे हस्तांतरीत करण्यात आल्याची माहिती सीआयएसएफचे सहाय्यक महानिरीक्षक तथा जनसंपर्क अधिकारी हेमेंद्र सिंग यांनी दिली.



 

Web Title: Gold worth Rs.19 lakh seized from foreign nationals in Mumbai airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.