ग्राहक बनून आलेल्या महिलांनी चोरले ५ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने

By कुमार बडदे | Updated: March 5, 2023 16:07 IST2023-03-05T16:06:47+5:302023-03-05T16:07:41+5:30

मुंब्राः ग्राहक बनून आलेल्या दोन महिलांनी ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल ५ लाख ८९ हजार १२० रुपये किंमतीचे सोन्याचे टाँप्स चोरुन ...

Gold jewelry of 5 lakh stolen women who have become customers | ग्राहक बनून आलेल्या महिलांनी चोरले ५ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने

ग्राहक बनून आलेल्या महिलांनी चोरले ५ लाख ८९ हजारांचे सोन्याचे दागिने

मुंब्राः ग्राहक बनून आलेल्या दोन महिलांनी ज्वेलर्सच्या दुकानातून तब्बल ५ लाख ८९ हजार १२० रुपये किंमतीचे सोन्याचे टाँप्स चोरुन नेल्याची घटना मुंब्र्यात घडली. कळवा शहरातील खारेगाव परीसरात रहात असलेल्या ललीतकुमार जैन यांच्या सोने-चांदी विक्रीच्या दुकानात शनिवारी संध्याकाळी दोन महिला लहान मुलाचे टाँप्स खरेदी करण्याच्या निमित्ताने दुकानात गेल्या होत्या,दुकानातील नोकर त्याना टाँप्स दाखवत असताना त्यांनी त्याला बोलण्यात गुंतवले आणि सोन्याचे टाँप्स असलेला बाँक्स चोरुन पसार झाल्या.

हे कळताच हवालदिल झालेल्या जैन यानी रात्री उशिरा याबाबतची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली.दाखल तक्रारी वरुन दोन अनोळखी महिलांविरोधात मुंब्रा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.दुकानाच्या परीसरातील तसेच दुकानामधील सिसिटिव्हि फुटेजच्या आधारे याप्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष उगलमुगले करत आहेत.

Web Title: Gold jewelry of 5 lakh stolen women who have become customers