शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

ओएलएक्सवर सायकल विकायला गेला अन‌् झाली फसवणूक  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2020 20:41 IST

Crime News : याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

ठळक मुद्देसुरज हा पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने बारा हजार रुपयांची सायकल खरेदी केली होती.

जऴगाव  : ओएलएक्स या ऑनलाईन साईडच्या माध्यमातून सायकल विक्री करण्याच्या नादात सूरज महेंद्र पाटील (वय २१, रा.भूषण कॉलनी) या तरुणाला २८ हजारात गंडविण्यात आल्याची घटना सोमवारी सकाळी साडेआठ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

सुरज हा पुण्याला अभियांत्रिकीचे शिक्षण घेत आहे. पाच वर्षांपूर्वी त्याने बारा हजार रुपयांची सायकल खरेदी केली होती. ही सायकल विक्री करायची असल्याने त्याने सोमवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास ओएलएक्स या साइटवर सायकलचे छायाचित्र अपलोड करुन जाहिरात टाकली. जाहिरात टाकताच सूरजला राकेश शर्मा नावाच्या व्यक्तीचा मोबाईलवर फोन आला. त्याने माझे ठाणे, मुंबईला दुकाने आहेत, याप्रमाणे गप्पा मारत सायकल खरेदी करायचे असून तुम्हाला पाठवलेल्या क्यूआर कोड स्कॅन करा त्यानंतर तुम्हाला संबंधित सायकलची रक्कम मिळेल असे सांगितले.सूरजने गुगल पे च्या माध्यमातून क्यूआर कोड स्कॅन करताच त्याच्या बँकेच्या खात्यावरुन अर्ध्या तासाच्या अंतरात दोन वेळा तीन हजार व दोन वेळा ११ हजार असे एकूण २८ हजार रुपये काढण्यात आल्याचे संदेश मोबाईलवर प्राप्त झाले. हे पैसे हे सपना राणी नामक महिलेच्या खात्यावर जमा झाल्याचेही सूरजला गुगलपेच्या माध्यमातून कळले. पैसे परत करण्याच्या बहाण्याने सूरजला संबंधितांचे फोन येत आहेत. आपली ऑनलाईन फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर सूरजने त्याच्या मित्रासह तक्रारीसाठी रामानंदनगर पोलिस स्टेशन गाठले आहे. यानंतर त्याला सायबर पोलीस ठाण्यात पाठविण्यात आले. तेथून पुन्हा रामानंद नगर पोलीस ठाण्यात तक्रार द्या असे सांगण्यात आले. या फिरवाफिरवमध्ये अखेर रामानंदनगर पोलिसांनी तक्रार घेतली. 

टॅग्स :fraudधोकेबाजीJalgaonजळगावPoliceपोलिसonlineऑनलाइन