गोव्यातील कोलवा किनारपट्टीवर वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; मुबंईच्या दोन युवतीची सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2018 20:59 IST2018-10-17T20:57:51+5:302018-10-17T20:59:11+5:30
मंगळवारी सांयकाळी उशिरा कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उपनिरीक्षक शिवराम गावकर, महिला हवालदार एलिझा फर्नाडीस, पोलीस शिपाई अजय नाईक व विकास कौशिक यांनी ही कारवाई केली. भा. दं. वि. च्या 370 (अ) व वेश्या व्यवसाय प्रतिबंधात्मक कायदा कलम 4,5,6 व 7 अंर्तगत पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.

गोव्यातील कोलवा किनारपट्टीवर वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश; मुबंईच्या दोन युवतीची सुटका
मडगाव - गोव्यात पर्यटन मौसमाला सुरुवात झाल्यानंतर किनारपटटीभागात वेश्यव्यवसायानेही आपले हातपाय पसरवायला सुरुवात केली असून, मुंबईहून युवती आणून त्यांना गोव्यात वेश्याव्यवसायाला जुंपणाऱ्या दोघांना काल मंगळवारी सांयकाळी राज्यातील दक्षिण गोव्यातील कोलवा पोलिसांनी अटक केली. अनिता रामदास भिसे (वय 45) या महिलेसह पोलिसांनी आझाद हुसेन खान (वय 45) या दलालांच्या मुसक्या आवळल्या. आज या दोघांना न्यायालयात उभे केले असता, त्यांना चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. अनिता या मूळ महाराष्ट्रातील नांदेड जिल्हयातील असून सध्या तिचे वास्तव मुबंईतल्या विरार येथील पालघर भागात होते असे तपासात आढळून आले आहे तर आझाद हा गोव्यातील मडगाव शहरातील मालभाट भागातील रहिवाशी आहे.
मंगळवारी सांयकाळी उशिरा कोलवा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक फिलोमिना कॉस्ता यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक उपनिरीक्षक शिवराम गावकर, महिला हवालदार एलिझा फर्नाडीस, पोलीस शिपाई अजय नाईक व विकास कौशिक यांनी ही कारवाई केली. भा. दं. वि. च्या 370 (अ) व वेश्या व्यवसाय प्रतिबंधात्मक कायदा कलम 4,5,6 व 7 अंर्तगत पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे.
कोलवा किनाऱ्यावरील पार्किंगच्या जागेत पोलिसांनी ही कारवाई करुन संशयितांच्या मुसक्या आवळल्या. मोबाईलच्या माध्यमातून संशयित गिऱ्हाईकांकडे संपर्क साधत होते. नंतर सौदा पक्का झाल्यानंतर गिऱ्हाईकांना युवती पुरविण्यात येत होते. कोलवा पोलिसांना ही माहिती मिळाली होती. त्याच्या आधारे पोलिसांनी सापळा रचून या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश केला.