मानवी कवटीमुळे फुटली दहा वर्षांपूर्वी झालेल्या खुनाला वाचा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 4, 2019 10:59 PM2019-03-04T22:59:49+5:302019-03-04T23:00:00+5:30

एका घरात सापडलेल्या मानवी कवटीचे गुढ उकलले असून. तब्बल दहा वर्षापुर्वी घडलेल्या खुनाला वाचा फुटली आहे.

Goa murder News | मानवी कवटीमुळे फुटली दहा वर्षांपूर्वी झालेल्या खुनाला वाचा

मानवी कवटीमुळे फुटली दहा वर्षांपूर्वी झालेल्या खुनाला वाचा

Next

 मडगाव - गोव्यातील मडगाव शहरात एका घरात सापडलेल्या मानवी कवटीचे गुढ उकलले असून. तब्बल दहा वर्षापुर्वी घडलेल्या खुनाला वाचा फुटली आहे. भिमसेन कोदागन्नूर (45) या इसमाचा जून 2008 साली खून झाला होता. मडगाव पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास करताना कर्नाटकातील बिजापूर जिल्हयातील कोन्नूर येथून परशुराम जत्तप्पा दोरहनहल्ली (35) याला जेरबंद केले आहे.

आज शनिवारी त्याला मडगावात आणून मागाहून रितसर अटक केली. संशयिताने खुनाची कबुली दिली आहे. मयत भीमसेन याचे संशयिताच्या आईशी अनैतिक संबध होते. दारुच्या नशेत तो तिला तसेच परशुराम व त्याच्या दोन बहिणींना मारहाण करीत होता. असाच एके दिवशी त्याने दारुच्या नशेत भांडण उरकरुन काढले असता, परशुराम व तिची आई रेणुका याने भीमसेन याला मारहाण केली होती. मारहाणीनंतर तो बेशुध्द पडला असता त्याचा गळा आवळला होता. मागाहून तो मरण पावल्यानतंर त्याचा मृतदेह पुरुन टाकण्यात आला होता. जून 2008 साली ही घटना घडल्यानंतर चार दिवसांनतर परशुराम व त्याचे कुटुंबिय गोव्यातून आपल्या मूळ गावी गेले होते.
आके येथील शेख इस्माईल याच्या मालकीच्या घराशेजारी असलेल्या स्टोअररुममध्ये रेणुका, तिचा मुलगा परशुराम व दोन मुलीसमवेत रहात होत्या. रेणुका हिचा पती बिजापूर येथे असून, मडगावात आल्यानंतर तिचे भीमसेनशी अनैतिक संबध जुळले होते. त्यातून भिमसेन हा तिच्या घरी ये - जा करीत होता. शेख इस्माईल हा पुर्वी दुबईला कामाला होता. भीमसेन बेपत्ता झाल्यानंतर रेणुका कुणालाही काहीही न सांगता अचानक आपल्या कुटुंबियांसमवेत नाहीशा झाल्या होत्या. त्यानंतर रेणुकाने आपला नवरा बेपत्ता असल्याचे सांगितले होते. त्यानंतर काही दिवसांनी रेणुकाच्या एका मुलीने त्यांना मालमत्तेच्या वादावरुन आपल्या आई - वडीलांचा खून झाल्याचे सांगितले होते.

शनिवारी या खोलीत मानवी कवटी व हाडे सापडल्यानंतर मडगाव पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला. यावेळी त्यांना तिरप्पा नावाची एक व्यक्ती भिमसेनला ओळखत असल्याची माहिती मिळाली. तिरप्पा व भिमसेन हे दोघेही व्यवसायाने टाईल्स फिटर होते. त्यामुळे ते एकमेकांचे परिचयाचे होते. पोलिसांनी तिरप्पा याला बोलावून घेउन चौकशी केली असता, मुलगा व बायको आपल्याला मारहाण करीत असल्याचे भीमसेन हा आपल्याला सांगत होता अशी माहितीही त्यांनी पोलिसांना दिली. भिमसेनचा पत्ता मिळविल्यानतंर पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे एक पथक बिजापूरला पाठवून देण्यात आले. तेथे पोलिसांनी तपास केला असता, परशुराम याने गावातील मालमत्ता विकून तो गाव सोडून कोन्नूर येथे रहात असल्याची पक्की माहिती मिळाली होती. त्यानंतर कोन्नूर येथे जाउन पोलिसांनी परशुरामाला ताब्यात घेतले. रेणुका हिने किटकनाशक औषध घेउन यापुर्वीच आत्महत्या केली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.

परशुराम याच्यावर भारतीय दंड संहितेच्या 302 व 201 कलमाखाली गुन्हा नोंद केला आहे. पुढील पोलीस तपास चालू असून, उदया मंगळवारी त्याला रिमांडासाठी न्यायालयात उभे केले जाणार आहे. रेणुका हिच्या दोन मुलीचा या खून प्रकरणात सहभाग आहे का याचाही सदया पोलीस तपास करीत आहे. त्या दोघांचा विवाह झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून, त्यांचा शोध चालू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
 

Web Title: Goa murder News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.